खेडमध्ये ८३ गावांमध्ये येणार ‘महिलाराज’

-८१ ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुले : अनेकांची संधी हुकल्याने भ्रमनिरास

दावडी : खेड तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. ३८ गावांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, २१ गावे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीसाठी, १३ गावात तर बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीसाठी, तर ९ गावात अनुसूचित जातीसाठी सरपंचपद आरक्षित झाले आहे. ५० टक्के महिलांना आरक्षण असल्यामुळे ८३ गावांमध्ये महिलाराज येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

खेड तालुक्यातील राजकारणी, गाव पुढारी व कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या सरपंचपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. अनेकांची लॉटरी लागली तर; अनेकांची संधी हुकल्याने कहीं खुशी, कहीं गम असे चित्र निर्माण झाले. १६२ पैकी ८१ पदे खुल्या प्रवर्गासाठी निघाली असून, तेथील निवडणुका कमालीच्या चुरशीच्या हाेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या खालोखाल ३८ पदे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित असून अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीसाठी २१, बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीसाठी १३, अनुसूचित जातीसाठी ९ ठिकाणी सरपंचपद आरक्षित झाले आहे. प्रियंका लाेखंडे या विद्यार्थिनीच्या हस्ते साेडत काढण्यात आली.
अनुसुचित क्षेत्रातील अनुसुचित जमातीकरीता स्त्री वर्गासाठी ११ आरक्षित गावांमध्ये एकलहरे, मोरोशी, परसुल, टोकावडे, शेंदूर्ली, डेहणे, भोमाळे, नायफड, शिरगाव, गोरेगाव, आव्हाड तर पुरुष वर्गासाठी आरक्षित १० गावामध्ये भोरगिरी, घोटवडी, धामणगाव खुर्द, कुडे बुद्रुक, वांद्रा, साकुर्डी, सुरकुंडी, खरपूड,धुवोली, खरोशीचा समावेश आहे.

अनुसूचित जाती साठी आरक्षित केलेल्या ९ गावांत स्त्री वर्गासाठी होलेवाडी, नाणेकरवाडी, आंभु, कोरेगाव बुद्रुक, मोई तर पुरुष वर्गासाठी बिरदवडी, वाजवणे, शिरोली, मेदनकरवाडीचे सरपंचपद आरक्षित झाले आहे.अनुसूचित जमातीसाठी आरक्षित केलेल्या १३ गावांमध्ये स्त्री वर्गासाठी ७ आरक्षित गावांचा समावेश करण्यात आला त्यामध्ये देवोशी, वाघू, पांगरी, सांगूर्डी, करंजविहिरे, खालुंब्रे, कन्हेरसर तर पुरुष वर्गासाठी वाकी खुर्द, कोयाळी तर्फे वाडा, रासे, दरकवाडी, आंबेठाण, सातकरस्थळ या ६ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित केलेल्या ३८ गावांमध्ये स्त्री वर्गासाठी १९ आरक्षित गावांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये गोनवडी, म्हाळुंगे इंगळे, शेलू, वडगाव पाटोळे, कडधे, रोहकल, अनावळे, अहिरे, रौधळवाडी, वाडा, कुडे खुर्द, कडाचीवाडी, निघोजे, पाईट, कुरुळी, सुपे, आडगाव, विऱ्हाम, येनिये खुर्द तर पुरुष वर्गासाठी जैदवाडी, दोंदे, वाकी बुद्रुक, सावरदरी, येनिये बुद्रुक, चिंचोशी, दौंडकरवाडी, गुळाणी, कडुस, मरकळ, कोयाळी तर्फे चाकण, वाफगाव, गोलेगाव, सायगाव, रेटवडी, चांदुस, पिंपळगाव तर्फे खेड, कोहिणकरवाडी, वडगाव घेनंद या १९ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

८१ सर्वसाधारणसाठी प्रवर्गासाठी आरक्षण

सर्वसाधारणसाठी आरक्षित केलेल्या ८१ गावांमध्ये स्त्री वर्गासाठी ४१ आरक्षित गावांचा समावेश करण्यात आला त्यामध्ये वेताळे, मांजरेवाडी, बहुळ, कोये, वाळद, टाकळकरवाडी, मिरजेवाडी, रानमळा, सांडभोरवाडी, आखरवाडी, आसखेड बुद्रुक, कमान, भांबोली, शेलगाव, किवळे, पाडळी, खरपुडी खुर्द, चिखलगाव, सोळू, पूर, आंबोली, कोळीये, दावडी, साबुर्डी, चऱ्होली खुर्द, बीबी बुरसेवाडी, हेद्रूज, औदर, तळवडे, वाशेरे, जऊळके खुर्द, पिंपरी बुद्रुक, गाडकवाडी, निमगाव, टेकवडी, वहागाव, कळमोडी, पापळवाडी, धामणे, आसखेड खुर्द, बहिरवाडी समावेश अाहे. पुरुष वर्गासाठी कान्हेवाडी तर्फे चाकण, खराबवाडी, वराळे, पाळू, येलवाडी, राक्षेवाडी, सिद्धेगव्हाण, केळगाव, धानोरे, कान्हेवाडी बुद्रुक, खरपुडी बुद्रुक, चांडोली, तिफणवाडी, कुरकुंडी, चिंबळी, काळुस, गारगोटवाडी, जऊळके बुद्रुक, कोरेगाव खुर्द, चास, औंढे, वाकळवाडी, भोसे, तोरणे बुद्रुक, वरुडे, शिवे, बोरदरा, वरची भांबुरवाडी, मोहकल, कोहिंडे बुद्रुक, देशमुखवाडी, तुकईवाडी, खालची भांबुरवाडी, चिचबाईवाडी, साबळेवाडी, गडद, शिंदे, वासुली, गोसासी व संतोषनगर इत्यादी ४० गावांचा समावेश करण्यात आला आहे.