माई किसान मंचचे अध्यक्ष एकनाथराव काटे यांचे निधन

एकनाथराव काटे हे कृषी पदवीधरांच्या संघटनेचे अध्यक्ष होते, तसेच त्यांनी संत गाडगेबाबा ग्रास्वच्छता अभियान राज्यस्तरीय मुल्यांकन समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते. यापूर्वी त्यांनी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात काम केलेले आहे. सध्या ते राष्ट्रवादीत कार्यरत होते. शेतीचे विविध प्रयोग त्यांनी केले होते. त्यांच्या मृत्यू पश्यात द पत्नी, दोन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

    बारामती: माई किसान मंचचे अध्यक्ष, काटेवाडी येथील प्रगतशील शेतकरी एकनाथराव मारुतराव काटे (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.रविवारी (दि २५) हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर पुन्हा आज ( दि ३०) त्यांना हृदयविकाराचा झटका आला, यामध्ये त्यांचे निधन झाले.एकनाथराव काटे हे कृषी पदवीधरांच्या संघटनेचे अध्यक्ष होते, तसेच त्यांनी संत गाडगेबाबा ग्रास्वच्छता अभियान राज्यस्तरीय मुल्यांकन समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते. यापूर्वी त्यांनी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात काम केलेले आहे. सध्या ते राष्ट्रवादीत कार्यरत होते. शेतीचे विविध प्रयोग त्यांनी केले होते. त्यांच्या मृत्यू पश्यात द पत्नी, दोन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.