‘जनरल मोटर्स’ मधील कर्मचाऱ्यांची सेवा कायम ठेवा- आमदार महेश लांडगे यांची मागणी

निवेदनात नमूद केले आहे की, तळेगाव दाभाडे येथील जनरल मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कामगारांना कोणतीही पुर्व सूचना न देता हि कंपनी चीन मधील ग्रेट वॉल मोटर्सला विकत असल्याची घोषणा केली. महाराष्ट्र शासनाने जनरल मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड व चीन मधील ग्रेट वॉल मोटर्स कंपनीसोबत माग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत सामंजस्य करार केला आहे.

पिंपरी:तळेगाव दाभाडे येथील जनरल मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चिनमधील एका कंपनीला विकली आहे. तसेच, तळेगाव येथील प्लांट बंद करण्याबाबत उद्योग मंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे कंपनीतील १ हजार ५७८ कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम ठेवण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना त्याबाबत निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, तळेगाव दाभाडे येथील जनरल मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कामगारांना कोणतीही पुर्व सूचना न देता हि कंपनी चीन मधील ग्रेट वॉल मोटर्सला विकत असल्याची घोषणा केली. १७ जानेवारी २०२० रोजी ही घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने जनरल मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड व चीन मधील ग्रेट वॉल मोटर्स कंपनीसोबत माग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत सामंजस्य करार केला आहे. परंतु सध्यस्थितीत केंद्र शासनाकडून परवानगी मिळणे अडचणी झाल्यामुळे जनरल मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने २० नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून कंपनी बंद करण्याची परवानगी मागितली आहे. या दोन्ही घटना परस्परविरोधी आहेत. त्यामुळे कंपनीतील १ हजार ५७८ कायमस्वरूपी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जनरल मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कामगारांना सेवा कायम ठेवण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी, आमदार लांडगे यांनी केली.