मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर मोठा अपघात : खासगी बसची ट्रकला मागून जोरदार धडक ; दोनजण गंभीर जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर पुण्याहून मुबंईकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटातील खोपोली एक्झिट जवळ खासगी लक्झरी बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर तर सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर पुण्याहून मुबंईकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटातील खोपोली एक्झिट जवळ खासगी लक्झरी बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर तर सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केलं.अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र सध्या वाहतूक सुरळीत झाली आहे.

खासगी बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात बसचा चालक व अन्य एक प्रवासी गंभीर जखमी आहे. इतर सहा प्रवासी किरकोळ जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस,  IRB यत्रंणा, देवदूत टीम यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने तात्काळ वाहतुक सुरळीत केली .