बनावट एफडीआर सादर करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध मोठी कारवाई; १८ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले

महापालिकेची फसवणूक केल्याचे आयुक्त राजेश पाटील यांचे निदर्शनास आले आहे. यापुढे अश्या प्रकारे मनपाची फसवणूक होणार नाही. यासाठी अशा ठेकेदारांना ४ वर्षासाठी काळया यादीत टाकणे तसेच ज्यांनी बनावट एफ.डी.आर सादर करून कामे मिळवले आहे. अश्या ठेकेदारंवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

    पिंपरी: पिंपरी चिचंवड महानगरपालिकेचे निविदा प्राप्त करत असताना जी कामे १० टक्के पेक्षा जास्त कमी दराची असतात. ती कामे पुढील प्रत्येक कमी दरासाठी अनामत रक्कम, बँक गॅरन्टी किंवा एफडीआर भरून घेतल्यानंतर सदर कामांना मंजूरी देऊन स्थायी समिती यांच्या मंजूरीने करारनामा करून, कामाचा आदेश दिले जातात. परंतु गेल्या काही दिवसात बोगस बनावट बँक गॅरंटी / एफ.डी.आर. सादर करुन महापालिकेची फसवणूक केल्याचे आयुक्त राजेश पाटील यांचे निदर्शनास आले आहे. यापुढे अश्या प्रकारे मनपाची फसवणूक होणार नाही. यासाठी अशा ठेकेदारांना ४ वर्षासाठी काळया यादीत टाकणे तसेच ज्यांनी बनावट एफ.डी.आर सादर करून कामे मिळवले आहे. अश्या ठेकेदारंवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

    या ठेकेदारांमध्ये मे.डी.डी.कन्स्ट्रक्शन, मे.वैदेही कन्स्ट्रक्शन, मे.एस.बी.सवई, मे.पाटील अँण्ड असोसिएट्स, मे.कृती कन्स्ट्रक्शन, मे.राधिका कन्स्ट्रक्शन, मे.बी.के.कन्स्ट्रक्शन अँण्ड इंजिनिअरींग, मे.भैरवनाथ कन्स्ट्रक्शन, मे.त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, मे.श्री दत्तकृपा एंटरप्रायजेस, मे.चैतन्य एंटरप्रायजेस, मे.डी.जे.एंटरप्रायजेस, मे.दीप एंटरप्रायजेस, मे.बी के खोसे, मे.म्हाळसा कन्स्ट्रक्शन प्रा.लि., मे.एच ए भोसले, मे.सोपान जनार्दन घोडके व मे.अतुल आर.एम.सी. यांचा समावेश आहे. या ठेकेदारांनी सादर केलेल्या बँक गॅरंटी / एफ.डी.आर. बनावट असलेचे आढळून आले आहे. या सर्व १८ ठेकेदारांना निविदा भरणेस प्रतिबंध करुन प्रथम ३ वर्ष कालावधीकरीता काळ्या यादीत समाविष्ट केले आहे.

    वरील १८ ठेकेदारांपैकी मे.डी.डी.कन्स्ट्रक्शन, मे.वैदेही कन्स्ट्रक्शन, मे.एस.बी.सवई, मे.पाटील अँण्ड असोसिएट्स, मे.कृती कन्स्ट्रक्शन, मे.राधिका कन्स्ट्रक्शन, मे.बी.के.कन्स्ट्रक्शन अँण्ड इंजिनिअरींग, मे.भैरवनाथ कन्स्ट्रक्शन, मे.त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, मे.श्री दत्तकृपा एंटरप्रायजेस अशा एकूण १० ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करणेत आले आहेत. तर मे.चैतन्य एंटरप्रायजेस, मे.डी.जे.एंटरप्रायजेस, मे.दीप एंटरप्रायजेस या संस्थांच्या मालक या महिला असून बनावट एफ.डी.आर./बँक गॅरंटी प्रकरणी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून न आल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल न करता त्यांना ४ वर्षासाठी काळ्या यादीत समाविष्ट केले आहे. मे.अतुल आर.एम.सी. यांनी संबंधीत प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर स्वतः गुन्हा दाखल केलेला असून काळ्या यादीत समाविष्ट केलेचे आदेशाबाबत मे.जिल्हा सत्र न्यायालय, पुणे येथे दावा दाखल केलेला असल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई केलेली नाही. तसेच मे.एच ए भोसले, मे.सोपान जनार्दन घोडके यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणेची कार्यवाही कार्यान्वित आहे.

    खोटी कागदपत्रे सादर करून प्रकल्प सल्लागार म्हणून मनपा पॅनेलवर नियुक्तीकरून घेतलेबाबत. मे.कावेरी प्राजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंन्ट यांच्या वर कारवाई बाबत मे.कावेरी प्राजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंन्ट तर्फे संतोष किरनळ्ळी यांनी मनपाच्या प्रकल्प सल्लागार पॅनेलवर अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र् सादर करून प्रकल्प सल्लागार पॅनेलवर नेमणूक मिळवली होती. सदर कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर सदरची बाब निदर्शनास आली आहे. त्यानुसार त्यांना काळया यादीत टाकण्यात येऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे बाबत आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.