१३० एकरावरील अतिक्रमण काढण्यास सुरूवात इंदापूर : पिंपळे (ता.इंदापूर ) वन विभागाने साडे अकरा हेक्टर डाळींब व उस शेतीचे अतिक्रमण काढण्यात आले. त्याच बरोबर तालुक्यातील वन विभागाच्या मालकीच्या १३० एकर

१३० एकरावरील अतिक्रमण काढण्यास सुरूवात

इंदापूर : पिंपळे (ता.इंदापूर ) वन विभागाने साडे अकरा हेक्टर डाळींब व उस शेतीचे अतिक्रमण काढण्यात आले. त्याच बरोबर तालुक्यातील वन विभागाच्या मालकीच्या १३० एकर शेत जमिनीवर पाच गावातील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. हे १३० एकर शेत जमिनीवरील अतिक्रमण येत्या तीन दिवसात काढले जाणार आहे. याची सुरुवात पिंपळे (ता. इंदापूर) येथून आजपासून करण्यात आली आहे. पिंपळे येथील शेत जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई पूर्ण केल्यानंतर पुण्याचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मारणे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात पुण्याचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर व उप वनसंरक्षकयांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रा वरील अतिक्रमण काढण्यात येत आहे. यानुसार पिंपळे येथील वनक्षेत्र वनसंवर्धन कायदा झाल्यानंतर कायदाझाल्यानंतर महसूल विभागाने वाटप केले होते. मात्र यामुळे १९८० च्या वनसंवर्धन कायद्याचा भंग झाला होता. त्यामुळे पिंपळे महसूल विभागाने वाटप केलेली क्षेत्र अतिक्रमण गृहीत धरून काढण्यात आले. येथील १३० एकर क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. यात डाळिंब मका कडवळ या व इतर पिकांचा समावेश होता. यानंतर वन विभागाच्या सीमा देखील निश्चित करण्यात आल्या. याशिवाय पुढील तीन दिवसात तालुक्यातील राजवडी, लासुरणे, गोखळी, वरकुटे खुर्द येथील शेतकऱ्यांनी वन क्षेत्रावर केलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

पिंपळे येथील जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढताना राज्य राखीव दलातील पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. या कारवाईत ७० वन कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी इंदापूरचे वन क्षेत्रपाल राहुल काळे यांचेसह महादेव हजारे, जयश्री जगताप, मुकेश सणस, आदी तालुका वन क्षेत्रपाल यांनीया कारवाई त सहभागी होते.