महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीत ITI पास उमेदवारांसाठी मोठी भरती; ‘असा’ करा अर्ज

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पुणे इथे दहावी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

    पुणे : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी पुणे इथे दहावी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे.

    पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

    या पदांसाठी भरती

    इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस – एकूण जागा 21

    पात्रता आणि अनुभव

    इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाच्या गरजेनुसार ITI प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

    निवड प्रक्रिया कशी असेल?

    यासाठी उमेदवारांचे दहावीचे गुण आणि ITI मधील चारही सत्रांच्या गुणांची बेरीज करून सरासरी काढण्यात येईल. त्यानुसार उमेदवरांची निवड केली जाईल. इतर कुठलेही गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.

    आवश्यक कागदपत्रं काय लागणार?

    पासपोर्ट साईझ फोटो

    कोणतंही एक ओळखपत्र

    ऑनलाईन रजिस्ट्रेशनची कागदपत्रं

    शैक्षणिक पात्रतेसंबंधीची कागदपत्रं

    शाळा सोडल्याचा दाखला

    मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र

    या सर्व कागदपत्रांची एक प्रत सोबत बाळगणं आवश्यक आहे.

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021