माणसाकडे दान देण्याची दानत असावी लागते : डाॅ.लहु कदम

इंदापूर : माणसाने दान दिल्याने कमी होत नाही,परंतु त्याच्याकडे दान देण्याची दानत असावी लागते. खर तर श्रीमंतांची मने लहान असतात, गरीबाची मने मोठी असतात, तुम्हाला काही देता नाही आले तरी चालेल पण

 इंदापूर : माणसाने दान दिल्याने कमी होत नाही,परंतु त्याच्याकडे दान देण्याची दानत असावी लागते. खर तर श्रीमंतांची मने लहान असतात, गरीबाची मने मोठी असतात, तुम्हाला काही देता नाही आले तरी चालेल पण गरीबांना प्रेम नक्की द्यावे,असे मत बालरोग तज्ञ डाॅ.लहु कदम यांनी व्यक्त केले.

चित्रपट निर्माते शिवकुमार गुणवरे यांचे माध्यमातुन स्वखर्चाने गरीब व गरजु कुटुंबाना धाण्य कीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर येथील कदम हाॅस्पीटल येथे करण्यात आले होते. त्या वेळी कदम बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, सहाय्यक पोलीस निरिक्षक बीराप्पा लातुरे,युवा नेते आमोलराजे इंगळे, राजनागरी पतसंस्थेचे चेअरमन भगवानराव जानकर आदी उपस्थीत होते.
डाॅ.कदम म्हणाले की, शिवकुमार गुणवरे आणि आम्ही गेली वीस वर्षे एकत्रीतपणे बरोबर आहोत. त्यांनी कलेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन कार्य केल्याचे सांगीतले.यावेळी इंदापूर शहरातील ४५ गरीब व गरजु कुटुंबाला तेल, गहू, तांदूळ, किराणा सामान कीट व मास्कचे वाटप करण्यात आले.

देशात व राज्यात कोरोना महामारीचा विळखा दिवसागणीक घट्ट होत चालला असुन, लाॅकडाउनमुळे गोरगरीबांच्या हाताला कामधंदा नसल्याने आनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा गरीब व गरजु कुटुंबाला शिवकुमार गुणवरे यांचे माध्यमातुन धाण्याची होणारी मदत ही लाख मोलाची असुन आर्थिक अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात देणारे शिवकुमार गुणवरे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, असे मत महेंद्र दादा रेडके यांनी व्यक्त केले.