त्यांनी दिली सुनेला मारण्याची सुपारी अन् त्यांचाच झाला मृत्यू, पाहा काय आहे हा प्रकार

मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा अर्थात दुसऱ्या सुनेच्या खूनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याला स्वतःच जीव गमवावा लागल्याची घटना पुणे  जिल्ह्यातील खेडमध्येे घडली आहे.  सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून केला आहे. विनायक पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. 

मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा अर्थात दुसऱ्या सुनेच्या खूनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याला स्वतःच जीव गमवावा लागल्याची घटना पुणे  जिल्ह्यातील खेडमध्येे घडली आहे.  सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून केला आहे. विनायक पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. (man who gave contract to kill his Daughter in law got killed )

विनायक यांचा मुलगा अजित याचा विवाह झाला होता. मात्र विवाह झालेला असताना अजितने कुटुंबीयांना माहिती न देता दोन वर्षापूर्वी प्रेम विवाह केला होता. याची माहिती वडील विनायक यांना कळली. मग विनायक यांची मुलगा अजितसोबत भांडण होऊ लागली.  हे सगळे दुसरा विवाह केल्यामुळे होत असल्याचं विनायक यांना वाटू लागलं.

मुलाचा पहिला संसार विस्कटल्याचं दुःख त्यांना होत होतं. त्यामुळे त्यांनी मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी आरोपी अविनाश राठोड, मोहम्मद शहजाद इस्लाम आणि मोहम्मद जब्बार यांना टप्याटप्याने १ लाख ३४ हजारांची सुपारी दिली. मग आरोपींनी खुनाचा कट रचला. मात्र महिलेचा खून करायचा असल्याने आरोपी घाबरले होते. त्यामुळे उशीर लागत होता.

दरम्यान, मृत विनायक (सासरे) हे सुनेचा खून कधी करणार? होत नसेल तर पैसे परत करा, असं म्हणत त्यांनी आरोपीकडे तगादा लावला होता. विनायक हे पैसे परत मागत असल्याने आरोपींनी त्यांना खेडमधील वराळे येथे बोलावून त्यांचा गळा दाबून त्यांचा खून केला. या प्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या म्हाळुंगे पोलिसांनी दोन आरोपींना पिस्तुलासह अटक केली. इतर एकाचा शोध पोलीस घेत आहेत. अविनाश  राठोड आणि मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर मोहम्मद जब्बार हा फरार आहे.