पुण्यातील मानाचे गणपती, यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार

केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने परंपरेनुसार पालखीतून केसरीवाड्यात मूर्ती आणली जाईल. केसरी चे विश्वस्त डॉक्टर रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात सर्व धार्मिक विधी होणार आहेत.बाप्पा थाटात विराजमान होणार आहेत.उत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

    गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजता केली जाणार आहे. यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने सामाजिक उपक्रमांवर अधिक भर दिला जाणार असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. उत्सव मूर्तीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने मंडळाच्या फेसबुक पेजवर याचेही दर्शन होणार आहे

    तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे.मंदिराभोवती घंटी महालाची आकर्षण सजावट सरपाले बंधूनी साकारली आहे.गणेश याग मंत्रजागर असे धार्मिक विधी होणार आहेत.गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा ऑनलाइन पाहता येणार आहे मंडळाच्या यूट्यूब पेज वर दर्शनाचीही सोय करण्यात आली आहे.

    केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने परंपरेनुसार पालखीतून केसरीवाड्यात मूर्ती आणली जाईल. केसरी चे विश्वस्त डॉक्टर रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात सर्व धार्मिक विधी होणार आहेत.बाप्पा थाटात विराजमान होणार आहेत.उत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

    दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सकाळी १० वाजून २३ मिनिटांच्या मुहूर्तावर अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक आरास करण्यात येईल. ऋषीपंचमीचा ११ सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे