मंचर पोलिसांची विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

मंचर : आंबेगाव तालुक्यातील वडगांव कािशंबेग येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने बफर क्षेत्र प्रशासनाने जाहीर केले असताना दोघेजण विनाकारण फिरताना आढळुन आल्याने त्यांच्यावर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल

मंचर :  आंबेगाव तालुक्यातील वडगांव कािशंबेग येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने बफर क्षेत्र प्रशासनाने जाहीर केले असताना दोघेजण विनाकारण फिरताना आढळुन आल्याने त्यांच्यावर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मंचर पोलिसांनी केलेल्या कारवाईत  वडगाव काशिंबेग येथील प्रकाश शिवराम कोकणे (वय ६८) शुभम बाळू कोकणे (वय २१) यांच्यावर  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. असे सांगुन पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले  आंबेगाव तालुक्यात कोरोना रुग्ण आढळलेल्या गावाच्या केंद्रस्थानी धरून त्याच्या जवळपासचा पाच किलोमीटरचे क्षेत्र प्रशासनाने बंफर क्षेत्र जाहीर केले आहे. या क्षेत्रात विनापरवाना फिरण्यास बंदी असतानाही अनेकांनी बाहेर पडून संसर्गाचा प्रसार होईल. असे वर्तन केल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे.नागरिकांनी घरातच थांबून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी केले आहे.: