बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांविरोधात मंचर पोलिसांची कारवाई

मंचर :  आंबेगाव तालुक्यातील जवळे आणि एकलहरे येथे बेकायदा दारु विक्री करणाऱ्या दोघांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुण ४ हजार ४३० रुपयांचा दारुसाठा मंचर पोलिसांनी जप्त केला आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांना एकलहरे आणि जवळे गावच्या हद्दीत बेकायदा बिगरपरवाना दारु विक्रीबाबत माहिती गुप्त बातमीदाराकडुन मिळाली.त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत जवळे गावाच्या हद्दीत पाईन वस्ती येथे पडक्या घराच्या िंभतीच्या आडोशाला दिनेश गोरक्षनाथ लायगुडे वय ३४ राहणार जवळे हा इसम बेकायदा दारु विकताना दिसुन आला. पोलीस आल्याची चाहुल लागल्याने तो पळुन गेला.सदर ठिकाणावरुन पोलिसांनी २ हजार ४९६ रुपयांचा दारुसाठा जप्त केला आहे.याबाबत पोलिस जवान प्रशांत भुजबळ यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पुढील तपास पोलिस जवान ईश्वर कदम  करत आहे. एकलहरे गावच्या हद्दीत कृष्णार्जुन मटण भाकरी ढाब्या नजीक निलेश अर्जुन डोके राहणार एकलहरे हा इसम बेकायदा दारु विक्री करताना दिसुन आला.पोलिस आल्याची चाहुल लागल्याने तो पळुन गेला.सदर ठिकाणावरुन १ हजार ९३४ रुपयांचा बेकायदा विक्रीसाठी आणलेला दारुसाठा मंचर पोलिसांनी जप्त केला.याबाबत पोलिस जवान सुदर्शन माताडे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पुढील तपास पोलिस जवान एस.आर.मांडवे करत आहे.