मंचर पोलिसांचे गणेश मंडळांना मार्गदर्शन

मंचर  : आंबेगाव तालुक्यातील  मंचर पोलिस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या गावांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंचर पोलिस मार्गदर्शन आणि खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सुचना देत आहेत. एक गाव एक गणपती बसविण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांनी केले आहे.  मंचर पोलिस ठाण्याच्या वतीने एक गाव एक गणपती असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार संबधित गावांचे बीट अंमलदार गावांत जावुन गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि गावचे प्रमुख यांची बैठक घेत आहे. त्यानुसार पिंपळगांव खडकी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोलिस जवान सागर गायकवाड, उपसरपंच रशिद इनामदार, स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर, वसंतराव राक्षे, पोलिस पाटील बबुशा वाघ,ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, मंच्छिद्र दोंदेकर,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बांगर तसेच मंडळांचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार वाढत आहे. गर्दी करण्यास बंदी आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा.गणेशमुर्ती चार फूट, तर घरगुती गणपतीची मूर्ती दोन फूट यापेक्षा जास्त नसावी.नागरिकांनी खबरदारी घेउन उत्सव साजरा करावा.याबाबत पोलीस जवान सागर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.