शिक्रापूर ता शिरुर येथे एका कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांसमवेत बसलेले मंगलदास बांदल व त्यांच्या पत्नी रेखा बांदल.
शिक्रापूर ता शिरुर येथे एका कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांसमवेत बसलेले मंगलदास बांदल व त्यांच्या पत्नी रेखा बांदल.

शिवसेनेच्या कार्यक्रमात बांदल यांच्याकडून आढळराव यांचे कौतुक
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील राजकारणातील जादूगार समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी आज प्रथमच शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावून शिवसेनेचे तोंडभरून कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम विभागाचे सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे कधी कोणत्या पक्षात जातील याचा कोणालाही नेम नाही आज पर्यंत अनेक निवडणुका वेगळ्या ताकतीने लढवून त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना एक हादरे दिले आहेत लोकसभा निवडणुकीदरम्यान स्वतः उमेदवार असल्याचे सांगत असताना अचानकपणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली दरम्यानच्या काळामध्ये शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात जोरदार प्रचार करत आढळराव पाटील यांना पराभूत करण्याची शपथ त्यांनी घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा प्रचार करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करा खासदार आढळराव पाटील यांना पराभूत केले आणि त्यांचा शब्द खरा करून दाखविला मात्र काही दिवसांपूर्वी मंगलदास बांदल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर आज त्यांनी शिक्रापूर येथील एका कार्यक्रमात हजेरी लावत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे तोंड भरून कौतुक करत लोकसभा निवडणुकीदरम्यान माझ्याकडून चूक झाली आम्ही नवीन उमेदवार निवडून आणला परंतु ते मतदारसंघात दिसलेच नाही त्यामुळे तुम्ही माजी खासदार असून देखील आजीच आहात, जनता तुम्हालाच खासदार म्हणते आहे कारण माजी खासदार हे मतदारसंघात दिसतच नाहीत अशी टीका देखील खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली, परंतु येथील येथून पुढील काळात खासदार आढळराव पाटील यांना मदत करण्याचे त्यांनी नमूद केली तसेच यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान आंबेगाव मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या साठी आमची शिफारस केलेली होती तसेच बांदल यांच्यासाठी फॉर्म देखील आणलेला होता असे सांगून मंगलदास बांदल यांची शिवसेनेशी असलेली जवळीक त्यांनी नमूद केली, तर आजच्या कार्यक्रमासाठी मंगलदास बांदल यांच्या पत्नी अपक्ष जिल्हा परिषद सदस्य रेखा बांदल या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्यामुळे अलीकडील काळात मंगलदास बांदल हे शिवसेनेमध्ये जातात की काय असा प्रश्न शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील सर्व जनतेला पडला आहे.

लवकरच भूमिका स्पष्ट करू – मंगलदास बांदल
शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवाला मी कारणीभूत आहे हे सर्वत्र मी स्पष्टच केलेले आहे, सध्याचे खासदार हे कोठेही दिसत नाही मात्र माजी खासदार जनतेवर ते फिरत आहेत हा आढळरावांच्या एक आदर्शच आहे, सध्या मी अपक्ष असून शिवसेनेत जाणार की नाही की कधी जाणार याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मंगलदास बांदल यांनी सांगितले.