मंगेश पोमन खून प्रकरण : आरोपी ऋषीकेश पायगुडे याला दोन पिस्टल, जिवंत राऊंडरसह लोणंद पोलिसांनी घेतले ताब्यात

दोनच दिवसा पूर्वी लोणंद पोलीसांनी संशयित आरोपी वैभव जगताप रा. पांगारे याला अटक करून त्याच्याकडून माहीती मिळवीली होती. तिघेही येरवडा कारागृहात असताना मंगेश पोमण यांचेशी त्यांचे वाद झाले होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर हा राग मनात धरून दोघांनी मिळून मंगेश यास मारहाण करून गळा आवळून खून केल्याची माहिती वैभवने पोलीसांना दिली तेव्हा पासून दुसऱ्या आरोपीचा शोध लोणंद पोलीस घेत होते.

    लोणंद : वाठार बुद्रुक येथील मंगेश पोमन खुनातील दुसरा आरोपी ऋषीकेश पायगुडे याला दोन पिस्टल, जिवंत राऊंडरसह लोणंद पोलिसांनी गजाआड केले. दि. ८ जून रोजी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत वाठार बुद्रुक तालुका खंडाळा गावच्या हद्दीतील नीरा उजवा कॅनॉल मध्ये अनोळखी इसमाचे प्रेत मिळून आले होते. यानंतर लोणंद पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर तपासामध्ये मयत मंगेश सुरेंद्र पोमण वय ३५ वर्षे राहणार पोमनगर पिंपळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे याचा अनोळखी इसमाने अज्ञात कारणावरून खून करून प्रेताच्या अंगावरील कपडे काढून ते फेकून देऊन पुरावा नाहीसा केल्याचे निष्पन्न झाले होते.

    दोनच दिवसा पूर्वी लोणंद पोलीसांनी संशयित आरोपी वैभव जगताप रा. पांगारे याला अटक करून त्याच्याकडून माहीती मिळवीली होती. तिघेही येरवडा कारागृहात असताना मंगेश पोमण यांचेशी त्यांचे वाद झाले होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर हा राग मनात धरून दोघांनी मिळून मंगेश यास मारहाण करून गळा आवळून खून केल्याची माहिती वैभवने पोलीसांना दिली तेव्हा पासून दुसऱ्या आरोपीचा शोध लोणंद पोलीस घेत होते.

    दरम्यान दि. १४ रोजी गुन्ह्यातील मुख्य कुख्यात गुंड प्रवृत्तीचा आरोपी  ऋषिकेश दत्तात्रेय पायगुडे रा. कुडजे ता. हवेली जिल्हा पुणे याच्या मुसक्या लोणंद पोलीसांनी नाशीकमधून आवळल्या. पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता तो पुणे येथून तडीपार असून त्याचे कडुन कुडजे पुणे येथून खुनाच्या गुन्हयात वापरलेले दोन पिस्टल व जिवंत राऊंड एक पल्सर मोटारसायकल जप्त केली.या कारवाईमध्ये  पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, विठ्ठल काळे, अविनाश नलावडे, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट, सागर धेंडे, अविनाश शिंदे, फैयाज शेख, गोविंद आंधळे, केतन लाळगे, चालक मल्हारी भिसे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला असून या सर्वांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे . या खुनाबाबत लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनी विशाल वायकर यांनी  पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली.