Manjiri Kahane of Sharad Sahakari Bank's commendable performance; Ph.D. in Commerce and Management. Graduated

खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील मंजिरी जगदीश कहाणे(Manjiri Kahane) यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Savitribai Phule Pune University)पीएच. डी. (डॉक्टरेट) पदवी वाणिज्य व व्यवस्थापन(Ph.D. in Commerce and Management) मंडळांतर्गत प्रदान करण्यात आली.

    पुणे : खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील मंजिरी जगदीश कहाणे(Manjiri Kahane) यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Savitribai Phule Pune University)पीएच. डी. (डॉक्टरेट) पदवी वाणिज्य व व्यवस्थापन(Ph.D. in Commerce and Management) मंडळांतर्गत प्रदान करण्यात आली.

    मंजिरी कहाणे यांनी “रोजगार निर्मिती व ग्रामीण विकासात सहकारी अधिकोष यांचे योगदान :- एक चिकित्सक ” अभ्यास या विषयावर संशोधन केले. त्यांना साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. जरे यांनी मार्गदर्शन केले.

    मंजिरी कहाणे या सध्या शरद सहकारी बँकेच्या घाटकोपर (मुंबई) शाखेत कार्यरत आहेत. त्यांच्या या संशोधनामुळे बँकेला नक्कीच फायदा होईल. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर तसेच सर्व संचालक मंडळ यांनी कहाणे यांचे हार्दिक अभिनंदन केले. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील प्रा. डॉक्टर पायल ओसवाल यांचे कहाणे यांना संशोधन कार्यात मोलाचे सहकार्य लाभले.

    कहाणे यांचे वडील जगदीश कहाणे हे राजगुरुनगर सहकारी बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्या यशाबद्दल दोनही बँकेच्या संचालक मंडळाने त्यांचे कौतुक केले आहे. मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमीतून स्वकर्तुत्वाने डॉक्टरेट मिळविलेल्या कहाणे यांनी राजगुरूनगरवासीयांपढे आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार तिळवण तेली समाजाचे विश्वस्त बाळासाहेब कहाणे यांनी डॉ. मंजिरी यांच्याबाबत बोलताना काढले.