मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सवलती तातडीने लागू करण्यात याव्या : ठोकमोर्चा व्दारे पुण्यात क्रांतीदिनी मराठा बचाव आंदोलन!

कोविड नियमांचे पालन करून केल्या जाणा-या या आंदोलनात प्रमुख मागण्यांमध्ये समाजाला ओबीसीच्या सवलती आरक्षण मिळेपर्यत लागू कराव्या, एसीबीसीच्या निकषानुसार २०१८मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्या, पुणे जिल्ह्यात शेतक-यांच्या जमीनी रिंग रोड साठी अधिग्रहीत करू नयेत.

    पुणे : मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सवलती तातडीने लागू करण्यात याव्या या प्रमुख मागणीसह अन्य सहा महत्वाच्या मागण्यांसाठी मराठा ठोक मोर्चाच्या वतीने पुण्यात विभागीय कार्यालयावर ९ऑगस्टच्या क्रांतीदिनी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आबासाहेब पाटील करणार असून मराठा बचाव आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

    ओबीसीच्या सवलती आरक्षण मिळेपर्यत द्या

    यावेळी ज्या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे त्यात म्हटले आहे की, हे आंदोलन कोणत्याही पक्ष संघटनेच्या झेंड्याखाली करण्यात येत नाही. कोविड नियमांचे पालन करून केल्या जाणा-या या आंदोलनात प्रमुख मागण्यांमध्ये समाजाला ओबीसीच्या सवलती आरक्षण मिळेपर्यत लागू कराव्या, एसीबीसीच्या निकषानुसार २०१८मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्या, पुणे जिल्ह्यात शेतक-यांच्या जमीनी रिंग रोड साठी अधिग्रहीत करू नयेत.

    आरक्षण मिळेपर्यंत समाजाच्या कोणत्याही जमिनी विकास कामासाठी अधिगृहित करण्यात येवु नयेत, त्याबाबत पूर्वी अधिग्रहण झालेल्या जमिनींचे सात/बारा तातडीने रद्द करण्यात यावे.