सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुण्यातील मराठा समाज आक्रमक

सरकारने या आंदोलनात आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करू नये. अन्यथा मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक होईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे.

    पुणे: मराठा समाज गेली ३२ वर्षे आरक्षणासाठी झगडतोय. मराठा तरुणांचे यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आता मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत. तसेच बेरोजगारीचेही प्रमाण वाढणार आहे. हा दिवस मराठा समाजाच्या प्रत्येक माणसासाठी काळा दिवस आहे. अशा प्रतिक्रिया देत मराठा समाजातील तरुणांनी पुण्यात काळ्या फिती लावून आंदोलन केले. राज्य आणि केंद्र सरकारने तरुणांचा अजिबात विचार केला नाही.

    सरकारने या आंदोलनात आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करू नये. अन्यथा मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक होईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे.

    राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत न्यायालय काय निर्णय घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. हा निकाल अन्यायकारक असल्याचे तरुणांनी सांगितले आहे.