राज्यातील महाविकास आघाडी सरकार कमी पडले- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची टीका

मराठा बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असलेला मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बोलता येणार नाही- आमदार लांडगे

    पिंपरी: मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. हा निकाल मनाला वेदना देणारा आहे. राज्यातल महाविकास आघाडी सरकार न्यायालयात बाजू मांडण्यात अयशस्वी झाले. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मेहनत आणि समस्त मराठा समाजाचे खडतर प्रयत्न यावर पाणी पडले आहे, अशी खंत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.
    महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असलेला मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बोलता येणार नाही. पण, हा निर्णय आमच्या तरुण पिढीवर अन्याय करणारा आहे. राज्य सरकारने दिलेले वकील न्यायालयात बाजू मांडण्यासाठी कमी पडले आहेत, असे आमदार लांडगे म्हणाले .

    आता मोठ्या खंडपीठाकडे जाण्याची मुभा आहे. त्यासाठी राज्य सरकारने सक्षमपणे बाजू मांडणे अपेक्षीत आहे. अन्यथा मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही.