माहेरहून २० लाख आणण्यासाठी सासरच्याकडून विवाहितेचा छळ

पीडित महिलेचा विवाह ऑगस्ट २०२० मध्ये झाला. तेव्हा पासून पती आणि सासरचे लोक विवाहितेचा छळ करत आहेत. पतीसाठी ब्रेसलेट घ्यायचे आहे, वॉशिंग मशिन घ्यायची आहे, घरासाठी २० लाख रुपये हवे आहेत

    पिंपरी: लग्नात मानपान केला नाही तसेच माहेरहून पतीसाठी ब्रेसलेट, वॉशिग मशिन, गॅस शेगडी आणि घरासाठी २० लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केल्याची घटना लोणी काळभोर येथे हा प्रकार घडला.

    या प्रकरणी पीडित विवाहितेने या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आनंद संजय मोहिते, संजय चंद्रसेन मोहिते, पुष्पा संजय मोहिते, अमोल संजय मोहिते, अंकिता संजय मोहिते (सर्व रा, आनंदनगर बंगला, लोणी काळभोर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह ऑगस्ट २०२० मध्ये झाला. तेव्हा पासून पती आणि सासरचे लोक विवाहितेचा छळ करत आहेत. पतीसाठी ब्रेसलेट घ्यायचे आहे, वॉशिंग मशिन घ्यायची आहे, घरासाठी २० लाख रुपये हवे आहेत, ते घेऊन ये अशी मागणी करत विवाहितेचा छळ करत आहेत. तसेच पतीन लग्नापासून अद्यापपर्यंत शारिरीक संबंध न ठेवता विवाहितेला हीन दर्जाची वागणूक दिली. माहेरच्या लोकांनी दिलेले सोनेही सासरच्या लोकांनी काढून घेत घरातून हाकलून दिले. चिखली पोलिस तपास करत आहेत.