भोरमध्येही बाजाराची आचारसंहिता

भोर : शहरात होत असलेली रोजची वाढती गर्दी कमी व्हावी आणि करोना व्हायरसला प्रतिबध व्हावा, या उद्देशाने भोर शहरातील अत्यावश्‍यक सेवा देणारी मेडिकल व किराणा भुसार मालाची दुकाने सोमवार ते शनिवार या सहा दिवशी सकाळी ९ ते १२ या वेळेतच उघडी ठेवली जाणार असून, या सहा दिवसांची आचारसंहिता तयार करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार तथा आपत्कालिन समितीचे अध्यक्ष अजित पाटील व मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली आहे.

 सकाळी ९ ते १२ दुकाने उघडणार

भोर : शहरात होत असलेली रोजची वाढती गर्दी कमी व्हावी आणि करोना व्हायरसला प्रतिबध व्हावा, या उद्देशाने भोर शहरातील अत्यावश्‍यक सेवा देणारी मेडिकल व किराणा भुसार मालाची दुकाने सोमवार ते शनिवार या सहा दिवशी सकाळी ९ ते १२ या वेळेतच उघडी ठेवली जाणार असून, या सहा दिवसांची आचारसंहिता तयार करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार तथा आपत्कालिन समितीचे अध्यक्ष अजित पाटील व मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली आहे. या विषयीची अधिक माहिती देताना तहसीलदार व मुख्याधिकारी म्हणाले की, या ठरवलेल्या आचारसंहितेनुसार भोर शहरातील शहरदूत व ग्रामीण भागातील ग्रामदूतांनाच बाजारपेठेत वाहन व त्याच्या चालकासह परवानगी देण्यात आली आहे.
याकामी भोर पोलिसांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या असून, भोर शहरात पोलीस निरीक्षक राजू मोरे व उपपोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात प्रवेश करणाऱ्यांची ते कसून चौकशी करत आहेत. विनाकारण कोणीही बाजारपेठेत प्रवेश केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.
-वारानुसार गावांचे नियोजन
सोमवार – महुडे व वेळवंड खोऱ्यांतील २८ गावे
मंगळवार – आंबवडे खोऱ्यातील २७ गावे
बुधवार – भुतोंडे व रायरी खोऱ्यातील ४० गावे
गुरुवार – हिर्डोशी खोऱ्यातील २२ गावे
शुक्रवार – पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्‍चंद्री ते किकवी, सारोळा व पुर्वेकडील अशी २० गावे
शनिवार – भोर शहर व वीसगांव खोऱ्यांतील २० गावे आणि
ऊत्रौली, भोलावडे व वडगांव डाळ आदी गावे.