पावसामुळे पिकाचे उत्पादन घटल्याने बिटाचे बाजारभाव कडाडले

मंचर  : बीट पिकाचे बाजारभाव वाढल्याने आंबेगाव तालुक्यातील बीट उत्पादक शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी खरेदी करत असल्याचे शेतक-यांनी सांगितले.

मंचर  : बीट पिकाचे बाजारभाव वाढल्याने आंबेगाव तालुक्यातील बीट उत्पादक शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी खरेदी करत असल्याचे शेतक-यांनी सांगितले.

-रेस्टॉरंट सुरु झाल्याने बिटची मागणी वाढली
आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिट पिकाचे उत्पादन घेतले जाते. मागील काही दिवसांपासून जोरदार स्वरुपाच्या पावसामुळे बीट पिक पाण्याखाली जाऊन खराब झाले आहे. त्यामुळे बिट पिकाचे उत्पादनही घटले असल्याने बाजारपेठेत बिटची आवक कमी होत आहे. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु झाल्याने बिटची मागणी वाढली आहे. मागणी जास्त आणि उत्पादन कमी यामुळे बीट पिकाचे बाजारभाव ५०० ते ६०० रुपये दहा किलो झाले आहेत.

-शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण
पावसातुन वाचलेली बीट काढून शेतकरी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहे. एका पिशवीचे वजन ५० ते ६० किलो दरम्यान भरत असल्याने अडीच ते तीन हजार रुपये प्रति पिशवीप्रमाणे शेतक-यांना पैसे मिळत असल्याने बीट उत्पादक शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चांडोली, पिंपळगाव, निरगुडसर, जवळे, भराडी, पारगाव ,काठापुर आदी गावांमध्ये बिटचे उत्पादन घेतले जाते,अशी माहिती देवगांवचे प्रगतशील शेतकरी बाबाजीशेठ गावडे यांनी सांगितले. ते म्हणाले १५ दिवसांपुर्वी बीट पिकाला २० ते ३० रुपये बाजारभाव मिळत होता. पावसामुळे बीट पिक सडल्याने उत्पादनात घट झाली आहे.त्याचा परिणाम बाजारभाव वाढण्यावर झाला आहे.