ब्रॉयलर कोंबड्यांचे बाजारभाव कडाडले

मंचर ः कोरोना व्हायरसमुळे चिकन खाणे आरोग्याला अपायकारक असल्याचा सोशल मीडियावरील अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला होता.

 चिकनला मागणी वाढल्याने पोल्ट्री व्यवसायाला सुगीचे दिवस

मंचर ः  कोरोना व्हायरसमुळे चिकन खाणे आरोग्याला अपायकारक असल्याचा सोशल मीडियावरील अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला होता. सद्यस्थितीत ब्रॉयलर कोंबड्यांची उपलब्धता आणि मागणी याचा ताळमेळ बसत नसल्याने ब्रॉयलर कोंबडीचे बाजारभाव कडाडले आहे. किरकोळ विक्रेते ब्रॉयलर कोंबडीचे चिकन १८० ते २०० रुपये किलो दरम्यान विकत आहे.
आंबेगाव तालुक्यात सहाशे पोल्ट्री फार्म आहेत. परंतु ब्रॉयलर कोंबड्यांमुळे कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव वाढतो.या अफवेमुळे कोंबडीला मागणी नसल्यामुळे काही पोल्टड्ढी फार्म बंद आहेत.सुमारे पन्नास टक्के पोल्टड्ढीफार्म बंद झाल्यामुळे मालाचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने आणि राज्य राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने ब्रॉयलर  कोंबडीचे चिकन आणि कोरोना विषाणूचा कसलाही संबंध नसल्याचे परिपत्रक जारी केले होते. त्यामुळे नागरिकांचा मांसाहार करण्याकडे कल वाढू लागला आहे. आता लाँकडाऊनमुळे बहुतांशी गावांमध्ये चिकन मटणाची दुकाने ठराविक वेळेत सुरु आहेत. चिकन व्यवसायिक फोनद्वारे ऑर्डर घेऊन सोशलडिस्टींगचे पालन करुन व्यवसाय करत आहेत. काही ठिकाणी घरपोच डिलिव्हरी सेवा उपलब्ध आहेत.
-आर्थिक नुकसान भरुन निघण्यास मदत होणार
लॉकडाउन होण्याच्या काळापुर्वी ग्राहकांकडून ब्रॉयलर कोंबडीला मागणी नसल्याने शेतकरी आणि कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आता कोंबडीचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांचे व कंपन्यांच्या आर्थिक नुकसान थोड्याफार प्रमाणात भरुन निघण्यास मदत होणार आहे,अशी माहिती निरगुडसर येथील पोल्ट्रीधारक प्रकाश वळसे पाटील, आंबेगाव अँग्रोचे शफीभाई मोमीन यांनी दिली. ब्रॉयलर कोंबडीची मागणी वाढल्याने बाजारात तुटवडा जाणवत असल्याने बाजारभाव वाढत आहे.३ मे ला लाँकडाऊन संपण्याची शक्यता केंद्र सरकारने जाहीर केला आहे. ग्राहकांची मागणी आणि ब्रॉयलर चिकनचा तुटवडा यामुळे ब्रॉयलर कोंबडीचे चिकन किरकोळ विक्रेते २५० रुपये किलोने विकण्याची शक्यता चिकन व्यवसायिक इसाक शेख, जावेद मिस्त्री, इम्रान मोमीन यांनी वर्तवली. मटनाचे दर सध्याच्या परिस्थितीत ६५० ते ७०० रुपये किलो दरम्यान आहेत.