मुंबईत नवीन घरबांधण्यासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी

आरोपींनी विवाहितेला तुला स्वयंपाक येत नाही. गॅसवर स्वयंपाक करू नको. स्टोव्हवर कर, असे वारंवार टोचून बोलून तु आम्हाला पसंत नाही. तु घटस्फोट दे, असे वारंवार बोलून विवाहितेचा छळ केला. तसेच मुंबईत नवीन घर बांधण्यासाठी व गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन येण्याची मागणी केली.

    पिंपरी : मुंबईत नवीन घर बांधण्यासाठी व गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नवी मुंबई तसेच सांगली – जत येथील वाळेखिंड येथे घडला आहे.

    सुनील जालिंदर शिंदे (वय ३४), जालिंदर लक्ष्मण शिंदे (वय ५८), अमोल जालिंदर शिंदे (वय ३०) आणि दोन महिला (सर्व रा. नवी मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ वर्षीय विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी विवाहितेला तुला स्वयंपाक येत नाही. गॅसवर स्वयंपाक करू नको. स्टोव्हवर कर, असे वारंवार टोचून बोलून तु आम्हाला पसंत नाही. तु घटस्फोट दे, असे वारंवार बोलून विवाहितेचा छळ केला. तसेच मुंबईत नवीन घर बांधण्यासाठी व गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन येण्याची मागणी केली. त्यावरून विवाहितेला मारहाण केली. तिचा मोबाईल नंबर आरोपींनी ब्लॉकलिस्ट मध्ये टाकला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.