हुंडयासाठी विवाहितेचा बळी ; पतीस अटक

माहेरून हुंड्याचे तसेच गावाला असलेले घर बांधण्यासाठी पैसे आणावेत यासाठी पती, सासू, सासरे व नणंद मृत विवाहितेला त्रस्त करीत होते. तसेच घरातील घरकामावरून सतत शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक त्रास देत होते व तिची आर्थिक छळवणूक करीत होते.

    पिंपरी: हुंड्यासाठी विवाहितेचा बळी घेतल्याची घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत मृत विवाहितेच्या वडिलांनी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार धनंजय विजय बांगर (वय-२८) विजय बांगर (वय-५७) सुनिता बांगर (वय-५२, सर्व रा. रेणुका वृंदावन सोसा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) चैत्राली पानसरे अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे असून, पती धनंजय बांगर यास पोलिसांनी अटक केली आहे.

    माहेरून हुंड्याचे तसेच गावाला असलेले घर बांधण्यासाठी पैसे आणावेत यासाठी पती, सासू, सासरे व नणंद मृत विवाहितेला त्रस्त करीत होते. तसेच घरातील घरकामावरून सतत शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक त्रास देत होते व तिची आर्थिक छळवणूक करीत होते. ५ एप्रिल २०२१ रोजी तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने तिच्या मृत्यूस वरील आरोपी कारणीभूत असल्याचे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे. घटनेचा तपास चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक कुदळे करीत आहेत.