Massive commotion in Pune postpones MPSC exams - Thousands of students take to the streets; Crowd obstruction obstruction police nausea

मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संताप पसरला आहे. पुण्यात हजारो परीक्षार्थी या निर्णयाविरोधात थेट रस्त्यावर उतरले आहेत. या आक्रमक परीक्षार्थ्यांनी पेठे येथे परिसरात रास्ता रोका केला. यावेळी गर्दी अडवता अडवता पोलिसांच्या नाकी नऊ आले.

    पुणे : मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संताप पसरला आहे. पुण्यात हजारो परीक्षार्थी या निर्णयाविरोधात थेट रस्त्यावर उतरले आहेत. या आक्रमक परीक्षार्थ्यांनी पेठे येथे परिसरात रास्ता रोका केला. यावेळी गर्दी अडवता अडवता पोलिसांच्या नाकी नऊ आले.

    राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. परीक्षा कधी होणार याबाबत लवकरच तारीखा जारीह केल्या जातील असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

    मागील दीड वर्षात पाच वेळा MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थी नाराज आहेत. आधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर कोरोना साथीचं कारण देत ही परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

    पुण्यात शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केलं. विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील दोन्ही रस्ते रोखून धरले होते. पोलिसांकडूनही विद्यार्थ्यांची धरपकड सुरु आहे. परीक्षेला अवघे तीन दिवस बाकी असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी नाराज झालेत. त्यांनी रस्त्यावर ठिय्या सुरु केला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी परीक्षार्थींची धरपकड सुरु केली आहे.