क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

पिंपरी चिंचवड परिसरातील क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पिंपरी: कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या यशस्वी व्यक्तीचा सन्मान करून त्याचे कौतुक केल्यास त्याला अधिक उत्साहाने काम करण्याची उर्जा प्राप्त होत असते. या माध्यमातून इतरांना देखील प्रोत्साहन मिळून यश संपादन करण्याची दिशा मिळते असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड परिसरातील क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी सत्कारार्थींना शुभेच्छा देताना महापौर ढोरे बोलत होत्या.  महापौर दालनात सांगवी येथील शिवामृत ग्रुपच्या वतीने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सत्कारार्थींना शिवामृत ग्रुपच्या वतीने सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेवक संतोष कांबळे, मोरेश्वर शेडगे, शिवामृत ग्रुपचे प्रमुख सुनिल साठे आदी उपस्थित होते.  कार्यक्रमात – सुधा खोले (कबड्डी प्रशिक्षक), मृदुला महाजन, सुनिता फडके, विजया फर्नांडिस, आरती कांबळे (शैक्षणिक क्षेत्र), मनिषा जाधव (अॅथलेटिक्स खेळाडू), ऐश्वर्या साठे (क्रिकेट क्षेत्र), खुशी मुल्ला (क्रिकेट खेळाडू), सोनल बुंदेले (धनुर्विद्या खेळाडू), स्वाती रानवडे, राखी जगताप (कराटे प्रशिक्षक), यशश्री राजभारत (हॉकी खेळाडू), पार्वती बकाळे (क्रिकेट प्रशिक्षक) पोलीस उपनिरीक्षक गजानन भोसले आणि मोहन जाधव यांचा देखील विशेष सन्मान महापौरांच्या हस्ते करण्यात आला.