महापौर मोहोळांनी ‘करुन दाखवलं’ ! बंद अवस्थेतील २१ व्हेंटिलेटर केले सुरु ; ससूनच्या डीनच्या आरोपांना कृतीतून उत्तर

महापौर म्हणाले, 'महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त वेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकाचे अखत्यारीत असलेल्या 'ससून'मधील व्हेंटिलेटर बंद असल्याची गंभीर माहिती समोर आल्यानंतर याची तातडीने दखल घेतली आणि हे वेंटीलेटर महापालिकेच्या ताब्यात घेऊन ते अवघ्या आठ दिवसात सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र किरकोळ कारणांसाठी आताच्या काळात गरजेचे असलेले व्हेंटिलेटर मोठ्या संख्येने पूर्णपणे बंद ठेवणे ही गंभीर बाब आहे.

  पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी पीएम केअर्सच्या माध्यमातून गेल्या वर्षी ससून रुग्णालयाला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी २५ व्हेंटिलेटर बंद असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या बैठकीत करण्यात आला होता. मात्र या दाव्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हे व्हेंटिलेटर महापालिकेच्या ताब्यात घेत २५ पैकी २१ व्हेंटिलेटर सुरु करून घेतले आहेत. आता ही व्हेंटिलेटर महापालिका रुग्णालय आणि ससूनमध्ये वापरण्यात येणार आहेत. महापौर मोहोळ यांच्या समयसूचकतेमुळे संकट काळात २१ व्हेंटिलेटर रुग्णसेवेसाठी उपलब्ध झाले आहेत.

  पंतप्रधान मोदी यांच्या पीएम केअर्समधून पुणे शहराला मिळालेल्या व्हेंटिलेटर्सपैकी ८० पेक्षा जास्त व्हेंटिलेटर ससूनला दिले होते. त्यापैकी ३४ व्हेंटिलेटर्स किरकोळ कारणांसाठी पूर्णपणे बंद ठेवले होते. याची चर्चा कोरोना आढावा बतगक बैठकीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमोर झाली होती त्यानंतर महापौर मोहोळ यांनी तातडीने ससून चे अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे यांच्याशी संपर्क करून महापालिकेच्या ताब्यात घेतले आणि हे व्हेंटिलेटर दुरुस्त करण्यासाठी एक विशेष तंत्रज्ञ च्या माध्यमातून व्हेंटिलेटर सुरू करण्यात यश आलं आहे

  याबाबत माहिती देताना महापौर म्हणाले, ‘महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त वेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकाचे अखत्यारीत असलेल्या ‘ससून’मधील व्हेंटिलेटर बंद असल्याची गंभीर माहिती समोर आल्यानंतर याची तातडीने दखल घेतली आणि हे वेंटीलेटर महापालिकेच्या ताब्यात घेऊन ते अवघ्या आठ दिवसात सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र किरकोळ कारणांसाठी आताच्या काळात गरजेचे असलेले व्हेंटिलेटर मोठ्या संख्येने पूर्णपणे बंद ठेवणे ही गंभीर बाब आहे.

  ‘दुरुस्त झालेल्या व्हेंटिलेटरपैकी ८ वेंटीलेटर ते बिबबेवाडी येथील रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आले असून इतर व्हेंटिलेटर पुणे महानगरपालिका आणि ससूनमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहेत आताच्या काळात व्हेंटिलेटर ची गरज असताना हे २१ व्हेंटिलेटर सुरू झाल्याने नक्कीच मोठा आधार मिळाला आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले

  ‘पीएम केअर्स’मधून पुणे शहराला नवे तीस वेंटिलेटर प्राप्त : महापौर
  केंद्रीय मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या घोषणे प्रमाणे वेंटीलेटर घ्यायला सुरुवात झाली असून पुणे महानगरपालिकेला पहिल्या टप्प्यात ‘पीएम केअर्स’मधून वेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. या ३० वेंटिलेटरमुळे आरोग्य यंत्रणेला मोठा आधार मिळणार आहे. तसेच शंकर महाराज मठ यांच्या माध्यमातून ५ व्हेंटिलेटर पुणे महानगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. या मदतीबद्दल धन्यवाद, असेही महापौर मोहोळ म्हणाले.