‘मी कार्ड’ तांत्रिक कारणांमुळे बंद

नाेंदणी केल्यानंतरच नवीन ‘ मी कार्ड ’ १ ऑगस्टपासून दिले जाणार आहे. हे नवीन कार्ड पीएमपीएलकडून माेफत दिले जाणार आहे. प्रवाश्यांनी अधिक माहीतीसाठी पुणे मनपा बिल्डिंग, हडपसर , काेथरुड, वारजे माळवाडी, कात्रज, विश्रांतवाडी, पुणे स्टेशन, माेलेिदना , वाघाेली, स्वारगेट, खडकी बाजार, डेक्कन, निगडी, भाेसरी, पिंपरी राेड चाैक, चिंचवड गाव येथील पास केंद्रावर संपर्क साधावा.

    पुणे :  पीएमपीएलने प्रवाश्यांकरीता सुरू केलेले ‘मी कार्ड’ तांत्रिक कारणांमुळे बंद केले आहे. नवीन ‘मी कार्ड’ दिले जाणार असल्याची माहीती प्रशासनाने कळविली आहे. पीएमपीने ज्येष्ठ नागरीक, जनरल पास आणि पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रवासाकरीता ‘मी कार्ड’ ही याेजना सुरू केली आहे. या याेजनेतील कार्ड तांत्रिक कारणामुळे बंद केले जाणार आहे. ते १ ऑगस्टपासून बदलून मिळणार आहे. त्यासाठी सदर कार्ड धारकांना ‘मी कार्ड’ आणि आधारकार्ड याची छायांकित प्रत ( झेराॅक्स ) घेऊन १९ जुलै ते २६ जुलै या कालावधीत नवीन कार्ड मिळविण्यासाठी नाेंदणी करावी लागणार आहे.