या बैठकीपूर्वी भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये लॉकडाऊन, वाढता कोरोना या विषयांवर चर्चा केल्याचे बोललं जात आहे. तसेच पुण्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याबाबतही त्यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परंतु पुणे हे पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरतं का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात आज कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमुळे पुण्यात लॉकाडाऊन लागण्याच्या हालाचलींनी वेग आला आहे.

    या बैठकीपूर्वी भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये लॉकडाऊन, वाढता कोरोना या विषयांवर चर्चा केल्याचे बोललं जात आहे. तसेच पुण्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याबाबतही त्यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त उपस्थितीत राहणार आहे. पुणे पालिकेच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे.