शेतकऱ्यांचे नुकसानीची वास्तव रक्कम पंचनाम्याच्या अर्जात नमूद करा : बाळा भेगडे

ओतूर : नुकत्याच झालेल्या 'निसर्ग' चक्र वादळाचा फटका शेती पिकाला बसला असून मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे तसेच घरांचे नुकसान होवून अनेकांना बेघर होण्याची वेळ आली आहे.याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्याची व्यथा

ओतूर : नुकत्याच झालेल्या ‘निसर्ग’ चक्र वादळाचा फटका शेती पिकाला बसला असून मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे तसेच घरांचे नुकसान होवून अनेकांना बेघर होण्याची वेळ आली आहे.याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्याची व्यथा समजून घेण्यासाठी राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री बाळा भेगडे यांनी जुन्नर तालुक्याला भेट दिली. शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले असून राज्याचे मा.मदत पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच जुन्नरचे तहसिलदार हनुमंत कोळेकर यांच्याशी संपर्क करून तत्काळ मदत शेतकऱ्याला मिळण्यासाठी चर्चा केली.

निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवला तसेच या वादळामध्ये शेती तसेच घरांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे या नुकसानीमुळे आधीच संकटात असणारा शेतकरी आता पुरता हतबल झालेला आहे अक्षरशः शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान होऊन त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे आधीच कोरोणाच्या संकटामुळे अडचणीतील शेतकरी आता निसर्ग चक्रीवादळाच्या रौद्र रूपामुळे देशोधडीला लागला आहे शेतकऱ्यांच्या या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मदत व पुनर्वसन मंत्री बाळा भेगडे हे जुन्नर तालुक्यात आले होते त्यांनी बेल्हे ,राजुरी,ओतूर,येणेरे याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. या वादळाचा जुन्नर तालुक्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याने माजी मंत्री बाळा भेगडे यांनी पंचनामे झालेल्या रक्कमेची नोंद घालूनच करा असे देखील यावेळी सुचवले.अनेक ठिकाणी नुकसान दहा लाखाचे आणि पंचनामा तीन लाख रुपये नुकसानीचा अशी परिस्थिती आहे असे होवू नये संबधित विभागाने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत अशा सूचना त्यांनी केल्या यावेळी त्यांच्या समवेतजुन्नर तालुका भाजपा अध्यक्ष संतोष तांबे,पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष दर्शन चौधरी,पंचायत समिती 

सदस्य शाम गावडे हे होते त्यांचे शिवजन्मभूमीत भाजपा जुन्नर तालुका अध्यक्ष संतोष  तांबे,भाजपा जुन्नर तालूका कार्याध्यक्ष अमोल शिंदे यांनी स्वागत केले.यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस सुनील शहा,जिल्हा अध्यक्ष अनू जाती मोर्चा रोहिदास भोंडवे,भाजप युवा मोर्चा जुन्नर तालुका अध्यक्ष प्रतिक जाधव,जिल्हा उपाध्यक्ष नामदेव अण्णा खैरे,भाजपा जुन्नर तालुका सरचिटणीस मयुर तुळे,संघटन सरचिटणिस जुन्नर तालूका प्रशांत पाबळे,संपर्क प्रमुख नवनाथ हांडे, भाजप युवा मोर्चा जुन्नर तालुका सरचिटणीस उमेश साळी,सह-संपर्क प्रमुख ,अविनाश मोरडे मा.संपर्क प्रमुख जुन्नर तालूका,अंबर परदेशी कार्याध्यक्ष जुन्नर शहर,गणेश बूट्टे पाटील भाजपा जुन्नर शहर अध्यक्ष ,उल्हास नवले उपाध्यक्ष जून्नर तालूका ,मधूकर काटे  संचालक आदि.महामंडळ,हरीष भावाळकर जिल्हा अध्यक्ष जेष्ट कार्येकर्ता आघाडी,जयदास साळवे अनू मोर्चा तालूका अध्यक्ष ,नरेंद्र तांबोळी मा.जुन्नर शहर अध्यक्ष, आकाश राजगुरु,मन्सूर चौगुले उपाध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी,सुनंदा घाडगे पुणे जिल्हा महिला सरचिटणीस,श्वेता गोसावी महिला शहराध्यक्ष ,काशिनाथ आवटे मा. संघटण सरचिटणिस जुन्नर तालूका ,गंगाराम औटी राजुरी शहर अध्यक्ष ,नजीर जमादार अल्पसंख्यांक सरचिटणिस जुन्नर तालूका ,इरफान चौगुले, सुमित खैरे, संजय फल्ले आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,