हवामान खात्याकडून अलर्ट जारी, राज्यातील या जिल्ह्यांना बसणार मुसळधार पावसाचा फटका, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या पुण्यात तुरळक पावसाच्या सरी पडताना दिसत आहे. मात्र आज पुण्यात ढगाळ वातावरणामुळे जोरदार पावसाची शक्यता सांगितली आहे. यातच उद्यापासून पुढील चार दिवस संपूर्ण पुणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे.

    पुणे : मुसळधार पावसानं अनेक दिवसांसाठी विसावा घेतला होता. मात्र मंगळवारपासून पावसाने पुन्हा एकदा मुसळधार हजेरी लावलेली आहे. जोरदार पावसामुळं अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं पहायला मिळत आहे. काही ठिकाणी वाहतुकीसाठी लोकांची कोंडी झाल्याचंही दिसत आहे.

    दरम्यान अशातच हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या पुण्यात तुरळक पावसाच्या सरी पडताना दिसत आहे. मात्र आज पुण्यात ढगाळ वातावरणामुळे जोरदार पावसाची शक्यता सांगितली आहे. यातच उद्यापासून पुढील चार दिवस संपूर्ण पुणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे.

    या पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट

    औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर अशा एकूण पंधरा जिल्ह्यांना आज हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. येत्या 5 दिवसांत अपेक्षित पावसाचा इशारा देण्यात आलाय. सध्या शहरात अंशतः ढगाळ वातावरण राहील. तर अन्य काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, काल दिलेल्या इशाऱ्याप्रमाणं राज्यात येत्या 5 दिवसांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटा सहीत पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात 6-7 स्पटेंबरला काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.