आगीच्या स्फोटात मीटर जळून कोळसा

आगीच्या घटनेमुळे मुळे येथील सर्व राहवाश्यांमध्ये घाबटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोसायटीत एकूण सहा कुटुंब राहतात अचानक लागलेल्या पुणे कॅन्टोन्मेंटची एक आणि पुणे महापालिकेची एक अशा दोन फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या माध्यमातून सादर आग विझवण्यात आली आहे.

    पुणे: भवानी पेठ येथील अग्रवाल कॉलनीमधील ७७९ हिरा बिल्डिंग या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावरील विद्युत पुरवठा करणाऱ्या मीटरला आग लागून मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सकाळी ९ च्या दरम्यान लागलेल्या या आगीत बिल्डिंगमधील तळमजल्यावर असलेल्या सोसायटीचे सर्व मीटर जळून कोळसा झाले आहे.

    आगीच्या घटनेमुळे मुळे येथील सर्व राहवाश्यांमध्ये घाबटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोसायटीत एकूण सहा कुटुंब राहतात अचानक लागलेल्या पुणे कॅन्टोन्मेंटची एक आणि पुणे महापालिकेची एक अशा दोन फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या माध्यमातून सादर आग विझवण्यात आली आहे. अग्रवाल कॉलनीच्या मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाने टाकलेल्या लोखंडी खांबामुळे फायर ब्रिगेडच्या गाडीला आता येण्यास विलंब झाला, त्यामुळे या गाडीला कॅन्टोन्मेंट कामगार वसाहत या ठिकाणाहून वळसा घालत अतिशय निमुळत्या रस्त्याने आत आल्यानंतर आग विझवण्यात आली.

    सोसायटीच्या फॉल्टी मीटरमुळे आग लागली असावी. त्यामुळे सहाच्या सहा मीटर जाळून खाक झाले. १५ मिनिटांत आग विझवण्यात आली. येथे उभ्या असलेली वाहने आणि लोखंडी खांब यामुळे गाडी आत येण्यास त्रास झाला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही- किसन गोगावले (तांडेल) पुणे मनपा फायर ब्रिगेड