पुण्यात विसर्जन मिरवणूकीला मेट्रो पूलाचा अडथळा ? संबंधित घटकांची बैठक बोलावण्याची मागणी

शहरात सार्वजनिक गणेशोत्वाची सांगता वैभवशाली िवसर्जन मिरवणुकीने हाेते. गणेशोत्सवात सजावट, देखावे व विसर्जन मिरवणूक मधील आकर्षक रथ,विद्युत राेषणाई हे आकर्षण असतात. यामुळे अनेक कलाकारांना व्यासपीठ उलब्ध हाेत असते. लक्ष्मी रस्त्यावरून मुख्य विसर्जन मिरवणुक निघते. तर कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता यामार्गाने विसर्जन मिरवणूकीतील गणेश मंडळे टिळक चौकातुन संभाजी पुलावरुन पुढे मार्गस्थ होते.

    पुणे :  शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकीला संभाजी पूलावरील मेट्रो पूलाचा अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यासंदर्भात संबंधित घटकांची तात्काळ बैठक बोलवा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

    शहरात सार्वजनिक गणेशोत्वाची सांगता वैभवशाली िवसर्जन मिरवणुकीने हाेते. गणेशोत्सवात सजावट, देखावे व विसर्जन मिरवणूक मधील आकर्षक रथ,विद्युत राेषणाई हे आकर्षण असतात. यामुळे अनेक कलाकारांना व्यासपीठ उलब्ध हाेत असते. लक्ष्मी रस्त्यावरून मुख्य विसर्जन मिरवणुक निघते. तर कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता यामार्गाने विसर्जन मिरवणूकीतील गणेश मंडळे टिळक चौकातुन संभाजी पुलावरुन पुढे मार्गस्थ होते. मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचे उर्वरित गणपती व शेकडो गणेश मंडळांच्या श्रींच्या मुर्तीचे विविविध विसर्जन घाटावर विसर्जन करतात. गणेश मंडळे कर्वे रस्यावरून एस.एम जोशी पूल मार्गे तसेच गोखले रस्ता, जंगली महाराज रस्त्याने पुढे जातात. कर्वे रस्त्यावर देखील मेट्रोचे स्टेशन झालेले असून याठिकाणाहून जाताना अडथळा निर्माण होणार आहे. विसर्जन मिरवणूकीतील रथ, रोषणाई यांची उंची साधारण ३५ फुट ते ४५ फुटापर्यंत असते.