मेट्रोची ‘ट्रायल रन’ पडली पार

मेट्रो लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी प्रशासनानं मेट्रोच्या कामाची गती वाढवली आहे. कोथरुड येथून वनाझ कॉर्नर (मेट्रो डेपो) ते आनंद नगर या मार्गावर प्रथमच मेट्रोची चाचणी पार पडली.

    पुणे: पुणेकर नागरिकांना लवकरच मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. प्रशासनानं मेट्रोच्या कामाची गती वाढवली आहे. नुकतीच पुण्यातील कोथरुड येथून वनाझ कॉर्नर (मेट्रो डेपो) ते आनंद नगर या मार्गावर प्रथमच मेट्रोची चाचणी पार पडली.

    मेट्रो लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी प्रशासनानं मेट्रोच्या कामाची गती वाढवली आहे. कोथरुड येथून वनाझ कॉर्नर (मेट्रो डेपो) ते आनंद नगर या मार्गावर प्रथमच मेट्रोची चाचणी पार पडली. रात्री १०:३० च्या सुमारास कोथरूड येथील मेट्रो डेपो ते आनंद नगर अशा तीन कोचची मेट्रो रुळावरून धावली.

    वनाझ ते रामवाडी हा कॉरिडॉर आहे. त्यातील कोथरूड भागातील पौड रोडवर वनाझ ते आनंद नगर मार्गावर मेट्रोची ट्रायल रन झाली. या ट्रायल रनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या ट्रायल चाचणीनंतर पुणेकरांना लवकरच मेट्रोतून प्रवास करायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.