सैन्य भरती परीक्षा पेपरफूट प्रकरण; मेजरला १५ पर्यंत पोलिस कोठडी

सैन्य भरती प्रक्रियेतील पेपर फुटी प्रकरणात मेजर दर्जाचे अधिकारी वसंत विजय किलारी यांना गुन्हे शाखेने दिल्ली येथून अटक केली. त्यांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष एस. आर. नावंदर यांनी दिला आहे. तामिळनाडू येथून अटक केलेला थिरू मगरून थंगवेल यांनी व्हॉट्स अॅपवरून लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका लिक केली होती.

    पुणे (Pune). सैन्य भरती प्रक्रियेतील पेपर फुटी प्रकरणात मेजर दर्जाचे अधिकारी वसंत विजय किलारी यांना गुन्हे शाखेने दिल्ली येथून अटक केली. त्यांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष एस. आर. नावंदर यांनी दिला आहे. तामिळनाडू येथून अटक केलेला थिरू मगरून थंगवेल यांनी व्हॉट्स अॅपवरून लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका लिक केली होती.

    थिरू यांना वसंत यांनीच ती पाठविली आहे. त्यांनी ती कुठून मिळविली, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी केली होती. थिरू मुरुगन थंगवेलू, किशोर महादेव गिरी, माधव शेषराव गिते, गोपाळ युवराज कोळी, उदय दत्तू औटी, भारत लक्ष्मण अडकमोळ या सहा जणांना याप्रकरणात यापूर्वीच अटक केली आहे. त्यापैकी किशोर, माधव आणि उदय हे तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित तिघे पोलीस कोठडीत आहेत. तर, अन्य दोघांवर गुन्हा दाखल आहे.