कन्हेरी (ता बारामती) येथील हनुमान मंदिरात मुर्तीला जितेंद्र काटे व उद्योजक अनिल मोहिते यांनी दुग्धाभिषेक घातला.
कन्हेरी (ता बारामती) येथील हनुमान मंदिरात मुर्तीला जितेंद्र काटे व उद्योजक अनिल मोहिते यांनी दुग्धाभिषेक घातला.

बारामती :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी काटेवाडी परीसरातील तीर्थक्षेत्र कन्हेरी येथील हनुमान मंदिरातील मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र काटे व युवा उद्योजक अनिल मोहिते यांच्या वतीने दुग्धाभिषेक घालून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, असे साकडे हनुमानाकडे घालण्यात आले. बारामती तालुक्यातील कन्हेरी याठिकाणी मारुतीचे प्रसिद्ध मंदिर आहे, जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ या मंदिरातच नारळ फोडून करण्यात येतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ ही याठिकाणीच केला जात होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना पाॅझिटीव्ह आली असून ते उपचार घेत आहेत.

उपमुख्यमंत्री अजितदादा हे आमच्यासह अनेक सामान्यांचे दैवत आहेत, त्याच्या साठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता प्रार्थना करत आहे. अजितदादा कोरोनावर मात करुन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी लवकरच कार्यरत होतील.

-जितेंद्र काटे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस