पुण्यात शुक्रवारी रात्री जलवाहिनी फुटल्याने पाणी धो-धो वाहत होते.
पुण्यात शुक्रवारी रात्री जलवाहिनी फुटल्याने पाणी धो-धो वाहत होते.

पुणे (Pune) :  जनता वसाहत येथे शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास जलवाहिनी फुटुन नऊ जण जखमी झाले. पर्वती पायथा येथून ही जलवाहिनी जनता वसाहतीतील चढावरील भागाच्या दिशेने गेली आहे. पाण्याच्या दाबामुळे नागरिक जखमी झाले तर अनेक घरात पाणी घुसले.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून निघालेल्या या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया गेले. जनता वसाहतीतील 40 ते 50 घरांमध्ये पाणी घूसून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून पाईपलाईनमधून गळती होत असल्याचे निदर्शनास आले होते. दुरूस्तीसंदर्भात तक्रार करूनही महापालिका प्रशासनाकडून दिरंगाई केल्यामुळे हा अनर्थ ओढावल्याचा संतापजनक आरोप स्थानिक रहिवाश्यांनी केला आहे.

जलवाहिनी फुटल्यानंतर पाण्याचा प्रेशर इतका जोरदार होता की त्यामुळे 9 ते 10 नागरीक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने गेल्यावर्षी घडलेल्या कालवा फुटीच्या घटनेची आठवण जागी केली. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाकडून जलशुद्धीकरण केंद्राला जोडणाऱ्या जलवाहिनीचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला असून तिच्या दुरस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांकडून जलवाहिनीच्या कडेला अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे केल्यामुळे गळती तसेच पाईप फुटण्याचे प्रकार होत असल्याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.