गेली वीस वर्षे सत्ता विरोधकांकडे होती मगं तुम्ही रस्ते का केले नाहीत ? ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विरोधकांवर शाब्दिक हल्ला

भविष्यकाळात शासकीय नियमानुसार आवश्यक त्या ठिकाणी बुडीत बंधारे करण्याचा प्रयत्न असेल.मागील वीस वर्षापूर्वी उपसा कमी होता,आता ती परिस्थिती नाही.जल उपसा वाढला असल्याने शेतकऱ्यांनी देखील पर्यायी सिंचन निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे.सदरील कामासाठी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले व पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे यांनी प्रचंड प्रयत्न केला. कधी कधी मी त्यांच्यावर रागवायचो पणं त्यांनी चिकाटी सोडली नाही.उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यामातून आता हे काम तडीस जात आहे.

  भाटनिमगाव : लाकडी निंबोडी योजनेवरुन विरोधक मुद्दा उपस्थित करित आहेत की, याचे लाईट बील कोण भरणार, यासाठी मोटार कितीची असेल परंतु तुम्ही याची बिलकुल काळजी करु नका ! आम्ही जर सर्व सांगत बसलो तर राजकारणासाठी हे कुठे काड्या घालून आमच्या प्रपंचाचे वाटोळं करतीलं म्हणून यांना काही सांगायला नको.शेटफळगडेत कुठून पाणी आनायचे ते आमचे आम्ही बघून घेऊ तुम्ही काळजी करु नका अशा शब्दात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांना ठणकावले आहे.

  भीमा नदीवरील भाटनिमगांव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचे उंबरठा पातळी वाढवण्याच्या कामाचे भुमिपुजन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते व पंचायत समिती कुर्डूवाडीचे सभापती विक्रम बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.१७) रोजी सकाळी संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.

  सोलापूर जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील,इंदापूर पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे, कृषी व पशु संवर्धन समितीचे माजी सभापती संजय पाटील,इंदापूर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,राजेंद्र तांबिले, रुई सरपंच माणिकराव झिंजे,सचिन देशमुख,पंढरी चंदनकर,भाटनिमगांवचे माजी सरपंच मनोहर भोसले,पंजाबराव गायकवाड,बाळासाहेब गायकवाड, श्रीमंत खबाले, नानासाहेब भोसले, सुभाष गायकवाड, दत्ता ढुके,अधिक्षक अभियंता भिमा पाटबंधारे धिरज साळे, कार्यकारी अभियंता ध.जि.कोंडेकर आदी उपस्थित होते.

  राज्यमंत्री भरणे म्हणाले,की आज या भागात मी आलो,भांडगांव असेल अवसरी असेल या कोपऱ्यातील मागील वीस वर्षापूर्वीचे रस्ते बघा. गेली वीस वर्षे सत्ता विरोधकांकडे होती मगं तुम्ही रस्ते का केले नाहीत ? का स्थानिकांचे प्रश्न सोडवले नाही? मागील दोन दिवसापूर्वी भाटनिमगांव बंधा-यावर टीका केली. मी घोषणा करत नाही तर ते काम प्रत्यक्षात सत्यात उतरवतो असे भरणे यांनी ठणकावून सांगितले.

  ते पुढे म्हणाले,की भविष्यकाळात शासकीय नियमानुसार आवश्यक त्या ठिकाणी बुडीत बंधारे करण्याचा प्रयत्न असेल.मागील वीस वर्षापूर्वी उपसा कमी होता,आता ती परिस्थिती नाही.जल उपसा वाढला असल्याने शेतकऱ्यांनी देखील पर्यायी सिंचन निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे.सदरील कामासाठी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले व पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे यांनी प्रचंड प्रयत्न केला. कधी कधी मी त्यांच्यावर रागवायचो पणं त्यांनी चिकाटी सोडली नाही.उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यामातून आता हे काम तडीस जात आहे.

  लाकडी निंबोडी विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले,कीया योजनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहिर केले.शेटफळगडेमध्ये कुठून पाणी आनायचे हे आम्ही बघून घेऊ, तुम्ही काळजी करायची गरज नाही. तुम्ही वीस वर्ष मंत्री होता मगं तुम्ही काय केले.जर केले असते तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती म्हणतं भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नांव घेता टीकास्त्र सोडले.तुम्ही जर कामे केली असती तर जनता आमच्याकडे आली नसती.साधा बावडा -भांडगांव रस्ताही तुम्हाला करता आला नाही.आता या मंडळींकडे काहीही उरलेले नसून विहिरीच्या पाण्याची परडी उजचायला ते येतील अशी तोफ भरणे यांनी डागली.

  कामात हयगय खपवून घेतली जाणार नाही ; ठेकेदाराला कडक सुचना

  सदर काम हे इंदापूर आणि माढा तालुक्यातील शेतक-यांच्या दृष्टीने भविष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.त्यामुळे सदर कामाचा दर्जा राखलाच पाहिजे.याकामात कोणतीही कसर खपवून घेतली जाणार नाही.स्थानिक शेतक-यांनी देखील याकामावर आपले लक्ष केंद्रीत करुन काम गुणवत्ता होत आहे याची वेळोवेळी खातरजमा करा. कोणतीही शंका उपस्थित झाल्यास किंवा कामात कसर वाटल्यास काम तात्काळ बंद पाडा असा आदेशच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भर सभेत दिला.त्यामुळे कामाची गुणवत्ता राखली जाण्याची शास्वती मिळाली.