वीज कोसळली आणि खडकातून पाण्याचे झरे ओसंडून वाहू लागले; गावकरी म्हणतात ‘ग्रामदैवत पावले!’

जुलै (July) उजाडला, पण बारामतीतील (Baramati) कारखेड गावात (Karkhed village) पाणी पेटलेलंच! थेंब थेंड पाण्यासाठी रोजचा संघर्ष. जेमतेव वापरापुरतं तरी पाणी मिळावं म्हणून गावकऱ्यांनी प्रशासनाकडे (the administration) शेकडो पत्रव्यवहार केले; मात्र, प्रशासन काही ऐकेना! ग्रामदैवत कोरेश्वराला (the village deity Koreshwar) काही गावकऱ्यांनी पावसासाठी साकडेही घातले. अखेर अचानक चमत्कार झाला.

    बारामती (Baramati).  जुलै (July) उजाडला, पण बारामतीतील (Baramati) कारखेड गावात (Karkhed village) पाणी पेटलेलंच! थेंब थेंड पाण्यासाठी रोजचा संघर्ष. जेमतेव वापरापुरतं तरी पाणी मिळावं म्हणून गावकऱ्यांनी प्रशासनाकडे (the administration) शेकडो पत्रव्यवहार केले; मात्र, प्रशासन काही ऐकेना! ग्रामदैवत कोरेश्वराला (the village deity Koreshwar) काही गावकऱ्यांनी पावसासाठी साकडेही घातले. अखेर अचानक चमत्कार झाला. मेघगर्जनांसह कडकडती वीज (thunderstorm) मंदिर भागातील खडकाळ माळरानावर कोसळली आणि तिथून गोड पाण्याचे खळखळते झरे वाहू लागले. भयान् जलसंकटाच्या काळात निसर्ग पावला की, ग्रामदैवत मदतीला धावला, याचं कोडं गावकऱ्यांना पडलयं.

    बारामती तालुक्यातील अनेक गावांना दरवर्षी दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागते. येथील सरासरी पर्जन्यमान ४२४.९ मिलीमिटरच्या दरम्यान असते. बारामती तालुक्यातील २२ गावे जिरायती पट्ट्यामध्ये मोडतात. यामध्ये कारखेल या गावाचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून कारखेल परिसरात तुरळक पाऊस सुरू होता. त्यात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. दरम्यान, ग्रामदैवत कोरेश्वर मंदिराच्या परिसरात वीज कोसळली. माळरानावर ज्या ठिकाणी ही वीज कोसळली त्याठिकाणि जमिनीतून पाण्याचे झरे वाहू लागले आहेत.

    गावातील मेंढपाळ आणि शेतकऱ्यांना माळरानावर अचानक जमिनीतून पाणी वाहताना दिसले आणि सगळेच अवाक् झाले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा तयार झाला आहे. ही घटना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत राजहंस भापकर या गावकऱ्याने प्रतिक्रिया दिली. आमच्या गावात कायमच पाण्याचे दुर्भिक्ष असते. उन्हाळ्यामध्ये जनावरांसह माणसांचे देखील पाण्यामुळे हाल होतात. वीज पडल्याने आमच्या दुष्काळी गावात गंगा अवतरली आहे, असे भापकर म्हणाले.