आमदार अशोक पवारांमुळे मिटला कित्येक वर्षांचा पाण्याचा प्रश्न

शिक्रापूर चाकण रोड परिसराला चव्हाण वस्तीला मिळाला हातपंप शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शिक्रापूर चाकणरोड परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरेशिक्रापूर चाकण रोड परिसराला चव्हाण वस्तीला मिळाला हातपंप

शिक्रापूर :
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शिक्रापूर चाकणरोड परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत असताना येथील महिलांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे याबाबत व्यथा मांडली असता या परिसरातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी आमदार पवार यांच्या प्रयत्नाने हातपंप मिळाला आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शिक्रापूर चाकणरोड परिसरातील चव्हाण वस्तीतील महिला व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे अनेक दिवसांपासून येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ग्रामपंचायत सदस्या गीता चव्हाण व काही महिलांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे परिसरात कायमस्वरूपी हातपंप बसविण्याची विनंती केली असता, आमदार अशोक पवार यांनी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांना याबाबत सूचना केल्या असता कुसुम मांढरे यांनी त्वरित जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन येथील परिसरात पाण्यासाठी विंधन विहीर घेऊन त्या ठिकाणी हातपंप बसविला आहे. अनेक वर्षांपासूनचा असलेला पिण्याचा पाण्याचा प्रश्न अखेर मिटला असल्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.