ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या; राष्ट्रवादीच्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना डिवचले

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे बहुमत असतानाही खेड पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झाल्याने वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत. दिलीप मोहिते-पाटील यांनी पडद्यामागून सूत्रे हलविल्यानेच राष्ट्रवादीला खेड पंचायतीवर वर्चस्व निर्माण करता आले असल्याचे सांगितले जात आहे.

    पुणे : खेड पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत असतानाही पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील(MLA Dilip Mohite-Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे( Chief Minister Uddhav Thackeray ) यांना डिवचले आहे. ज्या आमदारांच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झालात त्या आमदारांना समजून घ्या, असा टोला पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

    राज्यातील महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे बहुमत असतानाही खेड पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झाल्याने वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत. दिलीप मोहिते-पाटील यांनी पडद्यामागून सूत्रे हलविल्यानेच राष्ट्रवादीला खेड पंचायतीवर वर्चस्व निर्माण करता आले असल्याचे सांगितले जात आहे.

    या सर्व घडामोडींवर मोहिते-पाटलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या, असे सांगतानाच हा स्थानिक पातळीवरचा वाद आहे. त्याचा राज्य सरकारवर काहीच फरक पडणार नाही. आम्ही आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मानत आहोत, असे मोहिते-पाटील यांनी स्पष्ट केले.