पिंपरी-चिंचवडमधील सर्व खासगी रुग्णालयांचे आयसीयू विभाग महापालिकेच्या नियंत्रणाखाली घ्या  आमदार लक्ष्मण जगताप यांचे आयुक्तांना आदेश

कोरोनाची सध्याची परिस्थिती गंभीर होत चालली असल्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील खासगी रुग्णालयांबाबत कडक धोरण अवलंबवावे. पैशांअभावी ऑक्सिजन बेड मिळाले नाही म्हणून कोणत्याही नागरिकाचा जीव जाण्याची वाट न पाहता महापालिकेने खासगी रुग्णालयांचे आयसीयू विभागांचे नियंत्रण घ्यावे. खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आयसीयू बेडची माहिती दररोज महापालिकेच्या डॅसबोर्डवर प्रसिद्ध करावी. जेणेकरून शहरातील नागरिकांना त्याची माहिती मिळेल आणि ऑक्सिजन बेडसाठी कोणत्याही रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागणार नाही. या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत.”

    पिंपरी: चिंचवडमधील सर्व खासगी रुग्णालयांचे आयसीयू विभाग महापालिकेच्या नियंत्रणाखाली घ्या आमदार लक्ष्मण जगताप यांचे आयुक्तांना आदेश
    पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या धडकी भरवणारी असून, त्यातील गंभीर रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या युद्धपातळीवर नियोजन करून वाढविण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात महापालिका प्रशासन आणि कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन कमी पडत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे शहरातील खासगी रुग्णालये ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी गरजू रुग्णांकडून लाखो रुपये उकळू लागले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये गंभीर असलेल्या सामान्य रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या अधिकाराचा वापर करून शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमधील आयसीयू विभागांचे व्यवस्थापन महापालिकेने तातडीने स्वतःकडे घ्यावे, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.

    यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ मोठी आहे. रुग्णसंख्या निश्चितच शहरवासीयांची काळजी वाढवणारी आहे. तसेच गंभीर कोरोना रुग्णांची संख्याही चिंताजनक आहे. या गंभीर कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची संख्याही युद्धपातळीवर उभारणे गरजेचे आहे. परंतु, त्याबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे. तसचे कोरोना केअर सेंटर्समध्ये उपलब्ध ऑक्सिजन बेडचे योग्य व्यवस्थापन करण्यातही प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. अनेक गंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी दोन-तीन दिवस वाट पाहण्यास भाग पाडले जात आहे.

    दुसरीकडे ऑक्सिजन बेड उपलब्ध असलेली खासगी रुग्णालये लूट करत असल्याचे दिसत आहे. ही रुग्णालये ज्या रुग्णांकडे पैसे त्यालाच ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे कोरोना आजाराने गंभीर झालेल्या सामान्य रुग्णांनी जायचे कुठे?, असा प्रश्न पडला आहे. ही अतिशय गंभीर बाब असल्याने महापालिका प्रशासनाने ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. तसेच सरकारने दिलेल्या अधिकाराचा वापर करून शहरातील सर्व खासगी रुग्णालयांचे आयसीयू विभाग महापालिकेने स्वतःच्या नियंत्रणाखाली आणावेत. जेणेकरून खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजनचे बेड सामान्य रुग्णांनाही उपलब्ध होतील.