भोसरीतील ‘त्या’ चिमुकलीच्या मदतीसाठी आमदार महेश लांडगे सरसावले!

आमदार लांडगे यांनी याबाबत फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, वेदिका ही माझ्या मतदार संघातील रहिवाशी आहे. तिला स्पाईनल मस्कुलर ॲथ्रोपी (Spinal Muscular Atrophy) हा आजार असून, त्यातून तिला मुक्त करण्यासाठी झुलोजेनस्मा (zologensma) हे इंजेक्शन घेणे गरजेचे आहे.

    पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील वेदिका सौरभ शिंदे (वय ८) हिला स्पायनल मस्कूलर एट्रोफी उपचाराकरिता झुलोजेनस्मा (zologensma) हे इंजेक्शन देण्याची आवश्यकता आहे. ते अमेरिकेतून आयात करावे लागणार असून, त्याला भारत सरकारचा आयातकर लागू होणार आहे. तो कर माफ करावा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

    आमदार लांडगे यांनी याबाबत फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, वेदिका ही माझ्या मतदार संघातील रहिवाशी आहे. तिला स्पाईनल मस्कुलर ॲथ्रोपी (Spinal Muscular Atrophy) हा आजार असून, त्यातून तिला मुक्त करण्यासाठी झुलोजेनस्मा (zologensma) हे इंजेक्शन घेणे गरजेचे आहे. त्याची किंमत १७ कोटी असून, ते अमेरिका येथून आयात करावे लागणार आहे. इंजेक्शन खरेदी करण्यासाठीच्या खर्चाला केंद्र सरकारचा आयातकर लागू होतो. संबंधित कुटुंबियांना इंजेक्शनची किंमत पेलवणारी नसून आयातकरामुळे त्यामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा आयातकर रद्द करण्यात यावा. त्यामुळे संबंधित कुटुंबियांना आर्थिक दिलासा मिळेल. वैद्यकीय प्रक्रिया उत्तमप्रकारे पार पडण्यास मदत होईल, असेही लांडगे यांनी म्हटले आहे.
    दरम्यान, केंद्रात भाजपा सरकार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यानेवेदिकाला इंजेक्शनवर लागणारा आयातकर माफ झाल्यास काहीप्रमाणात शिंदे कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.