आमदार रोहित पवारांनी खोटे आरोप करू नये : नामदेव राऊत

कर्जत : आमदार रोहित पवार यांनी चुकीच्या व दुसऱ्या ने दिलेल्या चुकीच्या माहिती वरून बिनबुडाचे व प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने खोटे नाटे आरोप करू नये असे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

 कर्जत : आमदार रोहित पवार यांनी चुकीच्या व दुसऱ्या ने दिलेल्या चुकीच्या माहिती वरून बिनबुडाचे व प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने खोटे नाटे आरोप करू नये असे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 

    नामदेव राऊत यांनी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत  माहिती दिली. 
      रविवारी कर्जत येथे आमदार रोहित पवार आले असता त्यांनी कर्जत येथील नगर पंचायतच्या विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले होते.त्यावर उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आपली प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत दिली आहे.२४जून२०२० रोजी महापुरुषांच्या स्मारकाचा निधी रस्ते आणि गटर कामासाठी वळविल्याचे पत्र राज्य सरकारकडून प्राप्त झाले आहे.यावर आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण न देता दुसऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवरून झालेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले आहे.परंतु यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही.हे पुराव्यानिशी स्पष्ट करीत आहे.
      बाजारतळ येथील महावीर स्वामी स्मारकावर पीसीसी सह पेव्हर ब्लॉक आणि स्मारक याची अंदाजपत्रकीय रक्कम पाच लाख सत्तावन हजार तीनशे एक्कावन रूपये होती त्यावर अदा बील ४,४९,२६९|-रूपये आहे.तसेच म्हसोबा गेट बाजारतळाकड़े जाणारा रस्ता,तसेच म्हसोबा गेट ते मनीषा हार्डवेअर पर्यंत पेव्हर ब्लॉक चौक सुशोभिकरणातर्गत झाले असून स्तंभ बाकी आहे.यावर ४लाख ६१हजार ७६०रुपये बील अदा केले आहे.कापरेवाडी वेस येथे पेव्हर ब्लॉक टाकले आहे.येथे एकता चौक नियोजित असून अतिक्रमण काढ़णे बाबत हालचाली सुरु असून यावर ४लाख ६७हजार खर्च केला आहे.तर अण्णाभाऊ साठे स्मारकाचा आदेश झालेला आहे.हे स्मारक रस्त्यावर करावे की वस्तीत याचा विषय समोर आहे.अद्याप काम चालू नाही आणि एक रुपयाही काढलेला नाही.
भांडेवाडी चौक सुशोभिकरणाअंतर्गत या चौकाचे सध्या काम सुरु आहे.हा स्वागत चौक आहे.याचा एक रुपयाही काढण्यात आलेला नाही.कर्जत नगरपंचायत खात्यात हे पैसे जमा नाहीत यात पैसे काढले आणि त्यांनी साडे अडोतीस लाख रूपये काढल्याचा आमच्यावर आरोप केला आहे.यावर प्रत्यक्ष १३लाख १५हजार ३९६रुपये अदा केलेले आहेत.यापेक्षा जास्त पैसे काढल्याचे आमदार रोहित पवार यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरात घेऊन यावे.आमच्यावर हे आरोप ते केवळ जनतेत आमची प्रतिमा मलीन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.आतापर्यंत कामाची बीले ही शासकीय नियमानुसारच अदा केलेली आहे.आमदार पवार  हे एक अभ्यासु व्यक्तिमत्व आहे.त्यांनी दुसऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप न करता शहानिशा करुनच  आरोप  केले असते तर बरे झाले असते. 
 
 
आमदार रोहित पवार यांच्या कडे जर नगरपंचायतींच्या विविध कामात भ्रष्टाचार झाला असा आरोप केला होता. जर ़आमदार रोहित पवार यांच्या कडे पुरावे ़असतील तर त्यांनी ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरात घेऊन यावे मी ही माझे पुरावे घेऊन येतो असे आव्हान ही दिले.