आ.रोहित पवारांचा ‘जनता दरबार’ शेतकऱ्यांसाठी ठरतोय ‘आधार’ ; वीजसंदर्भातील कामांचा आढावा तर अर्धवट कामांवर तात्काळ तोडगा

कर्जत:कर्जत तालुक्यातील गावांच्या वीज प्रश्नांबाबत आमदार रोहित पावरांनी महावितरणचे अधिकारी व शेतकरी-ग्रामस्थांच्या उपस्थितीत नुकताच जनता दरबार घेतला.या जनता दरबारात आ.रोहित पवारांनी केलेल्या कामांचा आढावा सर्वांसमोर मांडला. तर शिल्लक कामांबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.तालुक्यातील अनेक गावांत रोहित्र वेळेवर दुरुस्त न होणे, कमी क्षमतेची रोहित्रे, थ्री फेज वीज जोडणी न मिळणे, सिंगल फेज वीज न मिळणे याचबरोबर लोमकळत असलेल्या वीज तारा,वाकलेले विजेचे खांब आदींबाबत चर्चा करण्यात आली.

सध्या तालुक्यातील विजेचे प्रश्न सोडवण्यात आले आहेत तर काही शिल्लक वीज प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील ७० टक्के विजेचे वाकलेले, गांजलेले खांब बदलण्यात आले आहेत. मागील काही दिवसात ३४ हजार लिटर रोहित्रासाठी लागणारे ऑइल उपलब्ध करण्यात आले होते. आत्ताही कर्जत जामखेडसाठी ५००० लिटर वाढीव ऑइल मागील आठवड्यात उपलब्ध करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना आ. पवार म्हणाले, दिवसा वीज मिळण्यासाठी सोलरचे प्रस्ताव केले आहेत केंद्र शासनाच्या या योजनेतून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. काही ठिकाणी विजउपकेंद्रे कमी क्षमतेची आहेत त्यासाठी त्यांची क्षमता वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. काही ठिकाणी नवीन वीज उपकेंद्रे मंजुर केली आहेत.११ नोव्हेंबर ते ३० ऑक्टोंबर या कालावधीत ३२८ रोहित्रे जळाली होती.९६९ खांब वाकलेले होते त्यातील ६७६ खांब बदलण्यात आले आहेत.राशीन भागातील अशा खांबांची संख्या जास्त आहे. आता शाळेच्या आवारात असलेली रोहीत्रे बाहेर काढायची आहेत, ज्या ठिकाणी उच्च दाबाच्या वीजतारा असतील त्यांना प्रोटेक्शन जाळी लावण्यात येणार आहेत शाळांच्या आवारातील खांबही हटवण्याच्या सुचना दिल्या आहेत.यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना माहिती सांगितली शाश्वत असलेल्या पाणी साठ्यावर सोलर पंपाच्या योजनेचा आढावा घेत मागील काही वर्षांपासून २२ कंपन्यांकडुन २३९७ रोहीत्रे घेण्यात आली होती. मात्र रोहित्र जळाले किंवा नादुरुस्त झाले तर त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य मिळणे त्या करारात नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत होत्या.रोहित्र जळल्यानंतर १५ दिवसात त्याबाबत कंपनीला नोटीस द्यावी लागते आणि मगच दुरुस्ती केली जाते मात्र एवढ्या कालखंडात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. आता तो कालावधी कसा कमी होईल यासाठी आ. पवार प्रयत्नशील आहेत.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. काही प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात आले.

जनता दरबारात शेतकाऱ्यांना मिळतोय लगेच न्याय!
आ.रोहित पवारांच्या जनता दरबारात ज्या त्या विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याने ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनांचा त्याच ठिकाणी सोक्षमोक्ष लागत आहे. एखाद्या अधिकाऱ्याने काम अडवून ठेवले असल्यास त्याला त्याच ठिकाणी जाब विचारून ठरल्या वेळेत काम करण्याची तंबी आ.पवार देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक थांबत असून त्यांना तात्काळ न्याय मिळत आहे.