मावळच्या वाझेंना दीड वर्षापूर्वी घरी बसवले; आमदार शेळकेंचा बाळा भेगडेंना टोला

    वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील सचिन वाझेंना मावळच्या जनतेने दीड वर्षापूर्वीच घरी बसवले. आपणही दहा वर्ष मावळ तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व केले आहे. प्रसिद्धीसाठी खोटेनाटे आरोप करू नये, असा जोरदार टोला आमदार सुनील शेळके यांनी माजी मंत्री बाळा भेगडे यांना लगावला. वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी (दि. ६ जून) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, उपस्थित होते.

    दलालांनी आमच्यावर टीका करू नये

    भेगडे म्हणाले, मावळ तालुक्यातील भाजचे काही पदाधिकारी कोणतीही विकासकामे न करता केवळ प्रसिद्धीसाठी महाविकास आघाडीवर खोटे- नाटे आरोप करतात. मावळच्या जनतेने सचिन वाझे कोण आहे, हे मागच्या दीड वर्षापूर्वीच ओळखले आणि घरी बसवले आहे. हे सांगण्याची वेळ तुम्ही आज आणली. आमचे कार्यकर्ते प्रशासनाबरोबर हातात हात घालून काम करत आहेत. हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे कृपा करून तुमच्या सारख्या एजंट-दलालांनी आमच्या कार्यकर्त्यांवर टीका टिप्पणी करण्याचे काम करू नये, असा हल्लाबाेल आमदार शेळके यांनी केला.