मनसेच्या रणनितीला मात देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी, पुणे मिशनसाठी दोन शिलेदारांची नियुक्ती

काल शुक्रवारी शिवसेनेकडून शिवसेना उपनेते सचिन अहिर यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर मनसेला रामराम ठोकत शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलेल्या आदित्य शिरोडकर यांना पुणे सहसंपर्कपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात मनसेला टक्कर देण्यासाठी शिवसेनेची स्मार्ट खेळी दिसून आली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून आगामी काळात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून रणनिती आखण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजही पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. परंतु मनसेच्या रणनितीला मात देण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. पुणे मिशनसाठी दोन खास शिलेदारांची नियुक्ती शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

    काल शुक्रवारी शिवसेनेकडून शिवसेना उपनेते सचिन अहिर यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर मनसेला रामराम ठोकत शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलेल्या आदित्य शिरोडकर यांना पुणे सहसंपर्कपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात मनसेला टक्कर देण्यासाठी शिवसेनेची स्मार्ट खेळी दिसून आली आहे.

    आदित्य शिरोडकर यांनी मनसेमध्ये शिक्षण विभागाशी संबंधित कामं केली आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणाईचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलं आहे. तसेच त्यांचा संपर्क सुद्दा दांडगा आहे. याच गोष्टीचा विचार करून आदित्य शिरोडकर यांच्यावर शिवसेनेनं नवी जबाबदारी दिली आहे.

    दरम्यान, पुणे महापालिकेत अधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडून रणनिती आखण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी आणि मनसेतून आलेल्या अनुभवी नेत्यांचा वापर पुणे मिशनसाठी चांगल्या प्रकारे करता येईल, याच उद्देशातून सचिन अहिर आणि आदित्य शिरोडकर यांची निवड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.