अल्पवयीन मुलांसह मोबाईल चोरटे जेरबंद; तीन गुन्हे उघड

मुंबई - पुणे महामार्गावर ताथवडे येथे सेवा रस्त्यावर दोघेजण एका दुचाकीवर संशयितरित्या थांबले आहेत. त्यांनी मोबाईल चोरी केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, वाकड पोलिसांनी परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५० हजार ५०० रुपये किमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

    पिंपरी:वाकड पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या एका चोरट्याला जेरबंद केले. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून दोघांकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

    मुकुलदेव देवेंद्रसागर सिंह (वय २३, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी याबाबत माहिती दिली. वाकड पोलीस परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सुरज सुतार आणि प्रशांत गिलबिले यांना मुंबई – पुणे महामार्गावर ताथवडे येथे सेवा रस्त्यावर दोघेजण एका दुचाकीवर संशयितरित्या थांबले आहेत. त्यांनी मोबाईल चोरी केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, वाकड पोलिसांनी परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५० हजार ५०० रुपये किमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

    या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी मुकुलदेव आणि त्याचा अल्पवयीन साथीदार हे मोबाईल हिसकावताना महिलांचा विनयभंग देखील करत असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक संतोष पाटील, अभिजित जाधव, फौजदार सिद्धनाथ बाबर यांच्या पथकाने केली.