वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी बनविली टोळी; रोहन चंडालिया टोळीवर मोक्काची कारवाई

सराईत गुन्हेगार रोहन चंदेलिया उर्फ चंडालिया याच्या टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले आहेत.

    पिंपरी (Pimpari).  सराईत गुन्हेगार रोहन चंदेलिया उर्फ चंडालिया याच्या टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले आहेत.

    टोळी प्रमुख रोहन राहू चंदेलिया उर्फ चंडालिया (वय 20, रा. जाधववस्ती, रावेत), विजय उर्फ गुंड्या निळकंठ शिंदे (वय 28, रा. ओटास्कीम, निगडी), प्रदीप महादेव जगदाळे (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी), विशाल सोळसे (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी), निलेश उर्फ निलू देविदास कांबळे (वय 22, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), यश उर्फ रघु अतुल कदम (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी), किरण शिवाजी खवले (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी), नंदकिशोर उर्फ मनोज उर्फ मन्या शेषराव हाडे (वय 25, रा.गणेशनगर,चिखली) आणि अन्य दोन अल्पवयीन मुले अशी मोक्काची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

    पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या विरोधात दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, घरफोडी, बलात्कार, अपहरण करणे, जबरी चोरी करून दुखापत करणे, दरोड्याची तयारी करणे, सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे एकूण 30 गुन्हे पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर येथे दाखल आहेत.

    ही टोळी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याबाबत गुन्हे शाखेच्या पीसीबी विभागाने या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोक्का) नुसार कारवाई करण्याचा अहवाल सादर केला होता. त्याला अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी गुरुवारी मंजुरी दिली आहे.